श्रीराम उत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

नवापूर, सत्यप्रकाश न्युज: 
        श्रीराम नवमी १७ एप्रिलला असून, श्रीराम नवमी उत्सव मोठ्या थाटात साजरा व्हावा, या उद्देशाने या वर्षी जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन नुकतीच श्रीराम नवमी उत्सव समितीची स्थापना केली. या उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शहरातील सरदार चौकात झाले. राष्ट्रीय संत परमपूज्य ललित नागर महाराज यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
   या वेळी श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती गठित करण्यात आली असून, अध्यक्षपदी अॅड. जितेंद्र दुसाने यांची निवड करण्यात आली. समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यात प्रामुख्याने महारक्तदान शिबिर १४ एप्रिलला, १५ एप्रिलला महिलांची मोटारसायकल रॅली, १६ एप्रिलला श्रीराम मंदिर येथे सुंदरकांड, १७ एप्रिलला दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी भव्य शोभायात्रेत १०८ बालगोपालांना श्रीराम पेहराव करून सजीव देखावा करण्यात येणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post