कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर माहेश्वरी यांची नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाचा परिक्षा केंद्रावर अचानक भेट......

परिक्षा सुरळीत सुरू असल्याचे समाधाननवापूर सत्यप्रकाश न्युज 
    दि. १३: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव चे कुलगुरु प्रोफेसर माहेश्वरी यांनी नवापूर येथील परिक्षा केंद्रावर अचानक भेट देऊन पाहणी केली. परीक्षा सुरळीत व शिस्तबद्ध पध्दतीने सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 
        कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखेतील पदवी स्तरावरील सत्र परीक्षा नवापूर महाविद्यालयात सुरु आहेत. शनिवारी या परीक्षा केंद्रावरील परीक्षा दालनात दुपारी सव्वाचार वाजता कुलगुरू प्रोफेसर माहेश्वरी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. जी. जयस्वाल यांचेशी त्यांनी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. परीक्षा सुरळीत व शिस्तबद्ध पध्दतीने सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक डॉ. राहुल ठाकूर, अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वाय. जी. भदाणे, अंतर्गत दक्षता पथकाचे सदस्य डॉ. एस. डी. पाटील व डॉ. सुरेखा बनसोडे, कु. मिना शहा या प्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post