कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे अपंग शिक्षकासाठी झाले देवदूत

डोंबिवली सत्यप्रकाश न्युज  
   मी श्री.बारक्या राघो भोईर , सहशिक्षक , रतनबुआ पाटील माध्य.विद्यामंदिर लोढा हेवन , निळजे , डोंबिवली ( पू ).
  मी आपणास सांगू इच्छितो की , मी एका पायाने दिव्यांग असून गेल्या अनेक वर्षापासून मी विनाअनुदानित तत्वावर काम करत होतो .मी अनुदानावर यावे यासाठी श्री म्हात्रे सरांची मी वारंवार भेट घेत होतो .सर मला साध्या आणि सोप्या शब्दात म्हणायचे की , "*भोईर सर तुम्ही काहीही काळजी करु नका , तुम्हा सर्व शिक्षकांचा प्रश्न मी सोडवणारच "*
     माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माझ्या बाबतीत तर सर सहजच बोलायचे, *भोईर सर तुम्हाला आर्थिक मदत जरी लागली तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे .काळजी करायची नाही*.त्यांच्या या वाक्याने मला खूप दिलासा वाटला .सरांच्या अथक प्रयत्नाने शेवटी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला व मी २०% अनुदानावर आलो .
   विषय एवढ्यावर थांबला नाही तर काही शासकीय अडचणींमुळे अनुदानाचा आदेश , वैयक्तिक मान्यता ,शालार्थ  आयडी यांसारखे प्रश्न अडून राहिले .परंतु एका दिवशी सर स्वतः जिल्हा परिषद ठाणे याठिकाणी दिवसभर थांबून रात्री ९:३० वाजता FRI  सारख्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या व आमचा सर्वांचा पुढील मार्ग मोकळा केला .
तरी सुध्दा जवळजवळ १० महिने माझ्या खात्यावर पगार जमा झाला नव्हता .मी स्वतः दिव्यांग असल्याने माझे सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाणे होत नव्हते तेव्हा मी माननीय म्हात्रे सरांना फोनवरुन वेळोवेळी माझी अडचण सांगत होतो .व त्या परिस्थितीत सरांनी प्रत्येक वेळी मला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य सुध्दा केले .
   अखेरीस माझ्या खात्यावर संपूर्ण १० महिन्याचा थकीत पगार जमा झाला .त्यामुळे मला , माझ्या कुटुंबीयांना , माझ्या सहकारी शिक्षकांना तसेच माझ्या शिक्षण संस्थेला सुध्दा या गोष्टीचा खूप आनंद झाला .आणि या आनंदाच्या भावनेनेच आज मी सरांचे तोंड गोड करण्यासाठी त्यांची सस्नेह भेट घेतली .
      दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर सुमारे  ठाणे,पालघर, रायगड  मधील 1000  शिक्षक -शिक्षकेतरां आणि राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतरांच्या  च्या वेतनाचा प्रश्न सोडवला आणि आज त्यांच्याही खात्यामध्ये पगार जमा झाला 
असे आमचे आधारस्तंभ असलेल्या कार्यसम्राट आमदार म्हात्रे सरांचे मनापासून आभार 

Post a Comment

Previous Post Next Post