विद्यार्थ्यांची जी क्षमता आहेत, कला कौशल्य आहेत जे गुण आहेत ते व्यक्त करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्व सामान्व्यायांना व्यासपीठ उपलब्ध मिळाले असून आज माझ्या या मुली जेव्हा या स्टेजवर येतात आणि जेव्हा दोन शब्द या ठिकाणी इतक्या प्रभावीपणे मांडतात मला हे. खरोखर आनंद वाटतो. या मुलांना घडवणारयांना मी वंदन करतो, असे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण झाले तर हा भारत देश अजून प्रगतीशील होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही असे प्रतिपादन डोकारे आदिवासी साखर कारखाना अध्यक्ष भरत गावीत यांनी व्यक्त केले.
महामानव डॉ. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त सोशियल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर आयोजित तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धाचे बक्षिस वितरण डॉ. बाबासाहेब
आंबेडकर जयंतीच्या निमित्त आयोजित करण्यात आले होते. बक्षिस वितरण डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत, जि.प महिला बालकल्यान सभापती संगिता गावीत, माजी नगराध्यक्ष गिरीष गावीत, हेमलता पाटील, , गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, माजी नगराध्यक्ष दामू बिन्हाडे, नरेंद्र नगराळे, चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी भरतगावीत बोलत होते. यात शालेय निबंध लेखन स्पर्धात प्रथम उर्वी विजयकुमार कदम, द्वितीय जागृती मुकेश महाले, तृतीय वेदीका संदिप चव्हाण, खुल्या निबंध लेखन गटात प्रथम भटेसिंग विठ्ठलसिंग गिरासे, व्दितीय मरीकोमल राजु साळवे, तृतीय राणी भिमराव पवार, शालेय वक्तृत्व स्पर्धात प्रथम जैसेजल इसाक गावीत व इशीता धमेंद्र पाटील, द्वितीय तनया प्रविन सांळुखे, तृतीय गौरी युवराज जाधव, खुला वक्तृत्व स्पर्धा प्रथम प्रा.डॉ नितिनकुमार माळी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार सोशियलडेव्हलपमेंट फाऊडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे, अॅड राहुल सिरसाठ यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी याप्रसंगी मतदार जनजागृती पर बोलत मतदान करण्याने आहवान केले, बालकिशन ठोंबरे यांनी गीत सादर केले. प्रास्ताविक चंद्रकांत नगराळे यांनी केले,
सूत्रसंचालन महेंद्र पाटील व तुषार पवार यांनी केले तर अॅड. राहूल शिरसाठ यांनी आभार मानले. यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विविध स्पर्धेतील सहभागी विद्यार्च्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात आली.
Tags:
सामाजिक