पहिले पाऊल - शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण- केंद्र शाळा करंजी खुर्द येथे संपन्न

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
      तालुक्यातील  करंजी (खुर्द)केंद्राची पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण जि.प. केंद्र शाळा करंजी (खुर्द)या ठिकाणी झाले. 
 प्रशिक्षणामध्ये करंजी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते.
प्रशिक्षणा दरम्यान अंगणवाडी सेविका, लीडर माता, स्वयंसेवक देखील हजर होते.
श्रीमती.ज्योती राठोड मॅडम व श्रीमती.सुनिता वळवी मॅडम यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षण घेऊन केंद्र स्तरावरती प्रशिक्षक म्हणून काम पार पाडले. 
या कामी गटशिक्षणाधिकारी श्री.आर .बी. चौरे साहेब, विस्ताराधिकारी श्री. मगर साहेब व केंद्रप्रमुख किशोर रायते सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. गेमजी वसावे सर व तंत्रस्नेही शिक्षक शरद गावित सर यांच्या मार्गदर्शनाने आजचे प्रशिक्षण प्रभावीपणे पार पडले. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष मेळाव्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले याकरिता केंद्र शाळा मुख्याध्यापिका श्रीमती.सरला पाटील मॅडम व इतर शिक्षक, शिक्षिका,पालक यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post