येथील पोलिस उपअधीक्षक पदी भागवत सोनवणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी बुधवारी पदभार स्विकारला. तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची बदली झाल्यानंतर शिरपूर उपविभागाचे डीवायएसपीपद रिक्त होते. त्यामुळे दोन दिवसापूर्वी सोनवणे यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
भागवत सोनवणे यांनी यापूर्वी नवापूर,अक्कलकुवा, नाशिक, मनमाड, पालघर, पनवेल आदी ठिकाणी काम केले आहे. ते वरळी (मुंबई) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
Tags:
यश/ निवड