शिरपूर सत्यप्रकाश न्युज
येथे दिनांक 11/05/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमी मिळाली की, दोन इसम हे गावठी बनावटीचे कटटे (बंदुक) व जिवंत काडतुसे बेकायदा त्यांचे कब्जात बाळगून चोरटी खरेदी विक्री करण्याकरीता त्यांचे ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम.एच. 20 एफई 5363 हिच्याने उमटी मध्यप्रदेश कडून खामखेडा शिरपुर मार्गाने येत आहेत अशी बातमी मिळाल्यावरुन पोलिस पथकातील पोको/1676 भूषण पाटील, पोकॉ/1454 संजय भोई, पोकॉ 15 स्वप्नील बांगर, पोकी/1677 योगेश मोरे, पोकॉ/1464 कृष्णा पावरा, चापोडेकों 514 अलताफ मिर्झा असे खामखेडा शिरपुर रोडवरील खामखेडा फाट्याजवळ वाहन थांबवून रोडाच्या बाजुस जावुन झाडाच्या आडोशाला लपुन बसले होते. काही वेळाने उमर्टी मध्यप्रदेश कडून एका मोटार सायकलवर दोन इसम डबलसिट बसलेले येतांना दिसले. त्यातील मागे बसलेल्या इसमाच्या हातात पांढ-या रंगाच्या रुमालात काही तरी गुंडाळलेले दिसले. सदर मोटार सायकल चालकाला इशारा देवुन थांबविले असता पोलीसांना पाहुन त्याने मोटार सायकलचा वेग वाढवुन शिरपुरच्या दिशेने मोटार सायकल पळवून घेवुन जात असतांना त्यांचा पाठलाग केला खामखेडा गावाजवळ रोडाच्या बाजुस त्यांनी त्यांची मोटार सायकल फेकून दिली व ते दोघे जवळच असलेल्या बाजरीच्या शेतात पळाले. पोलीसांनी बाजरीच्या शेतातून त्यांचा पाठलाग करुन पुढे काही अंतरावर असलेल्या अनेर नदीच्या काठाजवळ असलेल्या काटेरी झुडपातून आरोपी पळून जात असतांना त्यांना पकडले. त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नांवे 1) बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वय 28 मुळ रा.जानेफळ ता. भोकरदन जि.जालना ह.मू. संभाजीनगर, जय भवानीनगर गल्ली नं.11 अंकुश पवार यांचे घरात भाडेतत्त्वावर जि. संभाजीनगर 2) परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वय 26 वर्षे रा. देवळीगव्हाण ता. जाफराबाद जि. जालना असे सांगितले. आरोपी क्रमांक । बाबासाहेब रामभाऊ मिसाळ याचे हातात पांढ-या रंगाच्या रुमालात गुंडाळलेल्या कापडी पिशवीसह दोघांना बाजरीच्या शेतातून खामखेडा रोडवर आणले व पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात खालील प्रमाणे मुददेमाल मिळुन आला.
1) 1,50,000/- रुपये किंमतीचे एकुण 5 गावठी बनावटीचे कटटे (पिस्टल)
2) 22,000/- रुपये किंमतीचे 9 एम.एम.चे. 11 जिवंत काडतुसे
3) 1,30,000/- रुपये किंमतीची प्लसर कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम.एच.20 एफ.ई. 5363 एकुण 3,02,000/-
असा मुददेमाल मिळून आला असून दोन्ही आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह म.पो.का. कलम 37(1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. भागवत सोनवणे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई रफिक मुल्ला, पोहेकॉ/745 संदीप ठाकरे, पोकों/1676 भुषण पाटील, पोकॉ/1454 संजय भोई, पोकों 15 स्वप्नील बांगर, पोकों/1677 योगेश मोरे, पोकॉ/1464 कृष्णा पावरा, चापोलेको 514 अलताफ मिर्झा, चापोकों/ 1662 मनोज पाटील यांनी केली
Tags:
गुन्हे/अपघात