उपवर वर - वधुंना २९ जूनची प्रतिक्षा पुढचा योग तब्बल ५७ दिवसांनी

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
: सर्वत्र लोकसभा  निवडणूक सुरु असल्याने प्रचाराच्या काळात देखील लग्नसराई असली तर उमेदवारांसाठी पर्वणीच ठरते. कारण, लग्नात हजारो मतदारांची एकाच ठिकाणी गाठ भेट होते. त्यामुळे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे प्रचारही होतो. त्याचबरोबर ऐन मतदानाच्या दिवशी जर का लग्नतिथी असेल तर त्यादिवशी मतदानाचा टक्काही घसरतो; परंतु येत्या ३ मेपासून लग्नसराईच्या धामधुमीला पुढील ५७ दिवसांसाठीचा ब्रेक लागणार आहे. यामुळे मतदानाच्या दिवशीही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे, तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे.
     मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की यंदा ७ मे रोजी मंगळवारी लग्नतिथी नाही. यामुळे कार्यकर्त्यांचा ताण कमी झाला आहे. नाही तर लग्नसराईतून लोकांना आवाहन करून मतदान केंद्रात आणावे लागले असते. मात्र, उष्णतेची लाट असल्याने मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे हे एक मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगितले.
  चालू मे महिन्यामध्ये दोनच लग्नतिथी पंचांगात दिल्या आहेत. यात १ व २ मे या दोन तिथी आहेत. ३ मेपासून लग्नमुहूर्त नाहीत. यानंतर थेट २९ जूनलाच पुढील मुहूर्त आहे. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post