येथे अखिल भारतीय शिंपी समाजाच्या जळगाव येथील एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था, संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाँउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६ जून रोजी समस्त शिंपी समाजातील अहिर, नामदेव, भावसार, वैष्णव अशा अंतर्गत पोटजातीमधील उपवर सर्व वधुवरासाठी राज्यव्यापी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगांव येथील महाबळरोड येथे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सकाळी मेळावा होईल. अध्यक्षस्थान अखिल भारतीय समाजाध्यक्ष वनेश खैरनार भुषविणार आहेत. अनेक वर्षाच्या कालखंडानंतर जळगांव येथे राज्यव्यापी वधू वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने तसेच शिंपी समाजाच्या बालेकिल्ल्यात जळगांव येथे गर्दीचा उच्चांक गाठणार आहे. वधुवरांच्या नाव नोंदणीसाठी शिवाजीराव शिंपी यांच्या संपर्क कार्यालय व पालकांनी नोंदणी व अधिक माहिती साठी ९९२३३३४३०० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन अ.भा. उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी, चंद्रकांत जगताप, चेतन पवार, संदीप जगताप व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अशी माहिती मदन बोरसे यांनी दिली.
Tags:
सामाजिक