कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे साहेब यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा संपन्न

मुंबई सत्यप्रकाश न्युज 
     कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मा. निरंजन डावखरे साहेब यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा कोकण विभाग शिक्षक आमदार मा.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी आयोजीत केला होता, याप्रसंगी मुरबाड बदलापूर चे लोकप्रिय जेष्ठ आमदार मा. किसन कथोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मा. निरंजनजी डावखरे यांच्या उपस्थितीमधे  मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना ,  कला अध्यापक संघटना, आश्रम शाळा शिक्षक ,ठाणे पालघर, रायगड जिल्ह्णातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमधे संपन्न झाला.
       आ. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांवर विश्वास दाखवून ,  विधान परिषदेमध्ये  शिक्षक- शिक्षकेतरांचे  प्रश्न सोडवण्यासाठी  निरंजन डावखरे  यांना  तिसऱ्यांदा कोकण विभागातून  निवडून आणण्यासाठी  सर्वजण प्रयत्न करू असे  मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले
   अधिवेशना दरम्यान विधान परिषदेमध्ये  आमदार निरंजन डावखरे साहेब  तालिका सभापती म्हणून  खुर्चीवर बसल्यावर  शिक्षकांचे विविध प्रश्न मांडण्याची संधी मला ते नेहमी देतात व त्यामुळे  मी अधिक प्रमाणामध्ये शिक्षकांचे, शाळांचे, विद्यार्थ्यांचे संस्थांचे  प्रश्न आज पर्यंत मांडू शकलो आहे, पुन्हा एकदा निरंजन डावखरे साहेब निवडून आल्यानंतर विधान परिषद मला  शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी  मोलाचे सहकार्य होईल, म्हणून निरंजन डावखरे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने शिक्षकाने निवडून द्यावे असे आव्हान आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे  सर यांनी कार्यकर्त्यांनी केले"
         कोरोनाच्या कालावधीनंतर  पक्ष संघटनेची जबाबदारी  आल्याने माझ्याकडून कोकणातील लोकांच्या भेटीगाठी मध्ये गॅप पडला आहे, परंतु भविष्यात शाळा शिक्षक  आणि समाजासाठी अधिक वेळ मी देणार असे आमदार निरंजन डावखरे साहेब यांनी  आपल्या मनोगतातून सांगितले
       "शांत आणि सोज्वल  स्वभावाचे व्यक्तिमत्व निरंजन डावखरे असून  आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार निरंजन डावखरे  या दोघांनाही शाळांच्या आणि शिक्षकांच्या  प्रश्नासाठी, मी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार असे आमदार किसनजी कथोरे  साहेब यांनी सांगितले  व निरंजन डावखरे यांना  निवडून आणण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करा असे आवाहन केले.
      मेळाव्यासाठी  सल्लागार रमेश जाधव  बाळासाहेब सोनजे , लतेश नांदगावकर  जगन्नाथ खारीक ,  नगरसेवक तुकाराम दादा म्हात्रे, शिवछत्रपती संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख विष्णू विशे,  पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल गोरे, राज्य सचिव अरुण भोईर, ठाणे जिल्हा शहरी अध्यक्ष वसंत जोहरे, ग्रामीणचे अध्यक्ष धनाजी दळवी, पालघर शहरी विभागाचे अध्यक्ष महेश कुडू, ग्रामीणचे अध्यक्ष जयंत पाटील सर, कलाध्यापक संघटनेचे बेंडाळे , आश्रम शाळेचे  सुनील मोकाशी सर,  जिल्ह्यातील राज्य,  जिल्हा कार्यकारणी सदस्य तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post