जळगाव - सत्यप्रकाश न्युज
अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था, संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन ,नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन आयोजित वधु वर परिचय मेळावा तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून काल कार्यक्रम स्थळी एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष चंद्रकांत जगताप व सौ वंदना जगताप यांचे हस्ते सपत्नीक मंडप पूजन करण्यात आले तत्पूर्वी गणेश पूजन करण्यात आले तसेच शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत नामदेव महाराज यांचे प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले
यावेळी संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन अध्यक्ष चेतन पवार महिला अध्यक्ष सौ रुपाली निकुंभ नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन अध्यक्ष संदीप जगताप व सौ सारिका जगताप, एकता शिंपी समाज महिला अध्यक्ष सौ सारिका शिंपी यांनी देखील पूजन केले यावेळी वधु वर परिचय मेळावा स्वागत अध्यक्ष शिवाजीराव शिंपी स्वागत कार्याध्यक्ष संजय जगताप स्वागत सचिव सुजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य महिला मंडळ हे देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वधू वर परिचय मेळावा जळगांव येथील संभाजी राजे नाट्यगृह महाबळरोड जळगांव येथे दिनांक १६जून रोजी संपन्न होणार आहे.
Tags:
सामाजिक