महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक,डिग्री कॉलेज, आयटीआय, आश्रम शाळा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन खालील प्रश्न तात्काळ सोडवावेत, त्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक द्यावी अशी विनंती केली आहे व खालील प्रश्नांवर चर्चा सुद्धा केली.
अघोषित शाळांना घोषित करणे, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, टप्पा वाढ अनुदान, जुनी पेन्शन, संच मान्यता निकष, पवित्र पोर्टल भरती, अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करणे, शिक्षकेतर कर्मचारी भरती, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे समायोजन, आरटीई पुनर मान्यता, 25 % आरटीई प्रतिपूर्ती शुल्क मिळावे, आयटी शिक्षक मान्यता, आश्रम शाळेची वेळ, आयटीआय आर आर प्रमोशन, दिव्यांग शाळाअनुदान, 78 महाविद्यालय अनुदान, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच डोंबिवली मधील पेंढारकर कॉलेज संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालणे, राज्यातील नद्यांवरील रेड लाईन आणि ब्लू लाईन, इत्यादी विषयांवर चर्चा केली आहे.
Tags:
शैक्षणिक