पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप सोमवार दिनांक १०/६/२०२४ रोजी
मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी
सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री. संजय साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा (गुप्त वार्ता) श्री.सुखदेव पाटील,पोलीस निरीक्षक श्री. राजेश शिरसाट , श्री.सुधाकर बडगुजर,महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे उपाध्यक्ष श्री.पितांबर महाजन, खजिनदार श्री.श्यामजी फालके, अग्निशमन दल प्रमुख श्री.दीपक पोहरे,विशेष तज्ञ डॉ.श्री.सिकंदर शेख,यांनी अग्निशमन दल, सिव्हिल डिफेन्स व आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य, याबाबत
Brighton world school,( गुरुकृपा शिक्षणशास्त्र महाविद्यालय) गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथे आयोजित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन आवळे, मोटिवेशनल स्पीकर डॉ.श्री.किशोर अढळकर, आर एस पी ठाणे, नवीमुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,ठाणे,पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.श्री. मनिलाल रतीलाल शिंपी,ठाणे,विभागीय समादेशक श्री.महादेव क्षीरसागर,श्री.अनंत किनगे,
जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे,समादेशक आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत तुम्हाला गेले दहा दिवस प्रशिक्षण दिले गेले आहे याचा मला आनंद वाटतो कारण हे प्रशिक्षण योग्य ठिकाणी घेतलेले आहे.यापुढे आमच्यासाठी सुलभ काम करणारे कार्य तुम्ही करणार आहात, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे. जे काय तुम्हाला प्रशिक्षण मिळालेले आहे,त्या प्रशिक्षणाचा तुम्ही तुमच्या संबंधित शिक्षण संस्थेला, शाळेला, महाविद्यालयाला जर काय व्यवस्थित उपयोग करून दिला तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होणार आहे. तुम्ही केलेली प्रात्यक्षिके मी अगदी जवळुन पहिली.तुम्हाला दिलेले प्रशिक्षण आहे ते रक्तात भिनल्या सारखे ठेवा, आपल्याला दिलेले प्रशिक्षण हे मूलभूत, अंगभुत आहे.त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय कर्तव्य या देशभावणेने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.देशामध्ये सुव्यवस्था निर्माण व्हावी हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे,म्हणून तुम्हाला भावी काळासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देतो.तसेच तुमच्या सर्व आयोजकांनी चांगल्या प्रकारे आयोजन केले त्याबद्दल मी आमच्या पोलीस विभागाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो असे यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय साबळे यांनी सांगितले.
खाकी वाला खादी कधी घालू शकतो परंतु खादी वाला खाकी कधीही घालू शकत नाही.तो देशाच्या पंतप्रधान असो की राष्ट्रपती असो, तुम्ही सर्वांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे आत्ता आरएसपी अधिकारी झालात. व ही सेवा म्हणजे एक विशिष्ट सेवा आहे. व या सेवेला संपूर्ण महाराष्ट्रात चार चाँद लावण्याचे काम कोणी जर केले असेल तर ते या कल्याण शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये
दिलीप स्वामी व मनिलाल शिंपी यांनी, त्यांनी घेतलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. इस्राईल सारख्या देशात ८ ते ८० वर्षाच्या नागरिकांना आर्मी व फायरिंगचे प्रशिक्षण दिले जाते. कारण असे की पोलीस आणि मिलेक्ट्री यांनीच देशाची जबाबदारी घेतली आहे का,
त्यामुळे नागरिकांनी देखील जबाबदारी घेतली पाहिजे. तसं आर एस पी चे काम आहे. कोरोना काळात मनिलाल शिंपी यांनी,१५ शिक्षकांची टीम माझ्यासोबत मदतीला दिली होती. लोकांना वाटायचे की ही नवीन यंत्रणा आरएसपी पोलीस कुठून आली, काहींनी नेटवर सर्च करून पाहिले, अशी कुठे शासनाने नवीन यंत्रणा आणली,एस आर पी,बी एस एन,पी एस एन सारखी योजना आहे का? परंतु या सर्वांच्या मदतीने मी कोरोना काळात काम करताना यशस्वी झालो. व यावेळी कल्याण आर एस पी च्या टीमने खूप मोठे योगदान दिले.
पोलिसांनी खरोखरच चांगले काम केले तर नागरिक हा कुठेही ट्रॅफिक मध्ये थांबणार नाही.
अनेक धार्मिक उत्सवामध्ये आम्हाला वाहतुक सुरळीत करण्यासाठी आरएसपी ची गरज भासते.त्यामुळे कोरोनाच्या काळात आर एस पी म्हणजे काय आहे ते सामान्य जनतेला समजले असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा (गुप्त वार्ता)श्री.सुखदेव पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. मला दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली याचे सर्व श्रेय विभागीय समादेशक दिलीप स्वामी व मनिलाल शिंपी यांना देतो.नोकरी कशी केली जाते हे पोलिसांकडून शिकता येते. आर एस पी मध्ये नेमके काय आहे, प्रथम उपचार ,अग्निशमन, नागरी सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, व्यायाम, योगा आणि मेडिटोशन यांचा समावेश आहे.
कोणतेही काम करायचे असेल त्यासाठी सहकारी व एक चांगली टीम आपल्या सोबत असायला हवी. टीम चांगली असली की सर्व कामे पटापट होतात. म्हणून मी स्वामी सर व शिंपी सर यांना सांगितले की मी आहे ना तुमच्या पाठीशी, काय अडचण असल्यास सांगा.
महानगर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्याकडे जा आणि पत्र बनऊन घ्या. त्यांनी तात्काळ परमिशन दिले. व याबाबत पोलीस विभागाला आम्ही सर्व प्रकार सांगितला, त्यांनी आम्हाला लगेच सांगितली की आता कोणी अडचण निर्माण केली तर आम्हाला ताबडतोब कळवा. त्यांना काय करायचं आहे ते आम्ही बघतो, या संपूर्ण शिबिराची जबाबदारी मी स्वामी व शिंपी यांच्याकडे सोपविली होती व त्यांना सांगितले होते तुमच्या ओळखीची व जवळची लोक या प्रशिक्षणाला बोलवा, तसेच प्रसिद्धी प्रमुख श्री. किशोर जी पाटील यांनी देखील या ठिकाणी आपले भरपूर योगदान दिले, आपल्या सर्व बातम्या त्यांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध करून आपल्याला सहकार्य केले आहे,व प्रशिक्षणार्थी म्हणून देखील या ठिकाणी आले असल्याचे मला समजले, यापुढेही जेव्हा जेव्हा आर एस पी ची बातमी असेल त्या बातमीला प्रसिद्धी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.त्याच प्रमाणे श्री.किशोर अढळकर यांनी देखील सिव्हिल डिफेन्स च्या माध्यमातुन चांगले सहकार्य केले. तसेच या शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन आवळे यांनी देखील हा सभागृह उपलब्ध करून दिला,तसेच चहा पाणी व भोजन व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल,त्याच प्रमाणे कार्यक्रमाला सर्वांना ट्रॉफी देणारे मदतनीस यांचे देखील तसेच या प्रशिक्षण शिबीराला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर यांच्यावतीने मनःपूर्वक आभार मानतो. मला दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली याचे सर्व श्रेय मी विभागीय समादेशक दिलीप स्वामी सर व मनिलाल शिंपि सर यांना देतो असे यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे उपाध्यक्ष श्री.पितांबर महाजन यांनी अध्यक्षिय समारोप भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी यांनी केले.तसेच सूत्रसंचालन श्री.विनोद शेलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय समादेशक श्री.अनंत किनगे यांनी केले.
Tags:
सामाजिक