जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी गुन्हे बैठकीत जि विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल असून ते अद्यापही उघडकीस आलेले नाहीत. त्याअनुषंगाने सदर गुन्ह्यांचा तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांचेवर योग्य ती प्रतिबंधक करणेबाबत गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. कि खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेले मालमत्तेविरुध गुन्ह्यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, जेलमधुन सुटुन आलेले गुन्हेगार तसेच जिल्ह्याच्या सिमेस लागून असलेले गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील मालमत्तेविरुध्चे गुन्हें आरोपी यांबाबत आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवून संशयीत आरोपीतांचा शोध घेत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास एकता नगर परीसरात राहणारा अल्पवीयन मुलगार साथीदार यांच्यासह शहादा, तळोदा व नंदुरबार शहर परीसरात घरफोडीचे गुन्हे केले आ माहिती मिळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद अल्पवयीन बालकास ताब्य अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मध्य प्रदेश राज्यातील साथीदार यांन शहादा व तळोदा परीसरात घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यानुसार नंदुरबार जिल् पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जावून त्याचा साथीदार नामे राहुलसिंग मोतीसिंग भाटीया वय 25 वर्षे रा. ओसवाडा ता. पानसेमल जि. बडवाणी यास व नंदुरबार शहरातील पवन ऊर्फ शरद अरुण चव्हाण (गोंधळी) वय 22 वर्षे रा. एकता नगर नंदुरबार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी व त्यांचे इतर साथीदार मिळून शहादा पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 728/2023 भा.द.वि. कलम 454,457,380 व तळोदा पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 168/2024 भा.द.वि. कलम 4587,380 प्रमाणे गुन्हा केले असल्याची कबुली दिली.चौकशी दरम्यान नमुद आरोपीतांकडून शहादा पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 728/2023 भा.द.वि. कलम 454,457,380 गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 10 लाख 80 हजार रुपये किमतीचे 27 तोळे सोने व 80 हजार रुपये किमतीचे। किलो चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच तळोदा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 168/2024 भा.द.वि. कलम 457,380 गुन्ह्यात आरोपी नामे पवन ऊर्फ शरद अरुण चव्हाण (गोंधळी) वय 22 वर्षे रा.एकता नगर नंदुरबार याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 5 लाख 80 हजार 353 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीतास तळोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच ताब्यात घेण्यात आलेला अल्पवीयन व त्याच्या साथीदारांनी मिळून बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथे एकाच रात्री 07 ठिकाणो घरफोडी केल्या होत्या. त्याबाबत खामगांव शहर पोलीस ठाणे जिल्हा बुलढाणा येथे गु.र.नं. 276/2024 भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर घटनेतील CCTV फुटेज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपुत यांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस अंमलदार राजपुत यांनी सदर फुटेजमधील आरोपीतांना ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांनी सदर घटनेवावत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांचेसोबत चर्चा करुन बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी यांना कळविले, त्यावरुन खामगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नंदुरबार शहरातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून त्याच्याकडून 2 लाख 46 हजार 700 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करुन अल्पवयीन मुलास खामगांव शहर जिल्हा बुलढाणा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच दिनांक 26/05/2024 रोजी 00.35 वाजता श्री. संजय हिरालाल सोनी रा. प्लॉट नंबर 16. महाविर कॉलनी, नंदुरबार यांचे घराचे कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारुन चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करुन सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचे नुकसान केले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 211/2024 भा.द.वि. कलम 380, 427, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्यातील CCTV फुटेज स्थानिक गुन्हे शाखेने पाहिले असता संशयीत आरोपी हा नंदुरबार शहरातीलच सराईत गुन्हेगार असल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रशेखर नथ्थु मेश्राम वय-26 रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दि. 16/05/2024 रोजी 19/45 वा. सु. वेळावद ते उमेद गाव फाटयाचे दरम्यान रोडावर श्री.दिपक प्रितमदास हसाणी वय 45 वर्ष रा. प्लॉट नं. 20 मंगलमुर्ती नगर, नंदुरबार हे नंदुरबार येथे जात असतांना सदर रोडा दरम्यान एका अनोळखी मो.सा. वरील दोन अनोळखी इसम यांनी संगनमत करून फिर्यादी यांचे ताब्यातील नमुद मो.सा. हिस लाथ मारून फिर्यादी यांना खाली पाडून मो.सा. च्या हॅण्डलला असलेली लाल रंगाची पिशवी व त्यातील अंदाजे 45,000/- रुपये हे जबरीने हिसकावुन चोरुन पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 197/ 2024 भादंवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा देविदास पवार रा. नारायणपूर ता.जि. नंदुरबार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असलेबाबत माहीती मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी सदर माहिती स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना देवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी एक पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी तात्काळ रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणपूर ता.जि. नंदुरबार येथे जावून मिळालेल्या बातमीमधील देविदास पवार याबाबत माहिती काढून त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ।) देविदास रघुनाथ पवार वय-24 रा. नारायणपूर ता.जि. नंदुरबार असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत इसमास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा धानोरा व कोठली येथील त्याच्या इतर 5 ते 6 साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याचे इतर साथीदार 2) मनिष दिलीप वसावे वय-22 वर्षे 3) रोहित विष्णू वसावे वय-21 दोन्ही रा. धानोरा ता.जि. नंदुरबार 4) हितेश राजेंद्र पाडवी वय-22 वर्षे 5) निखील सुनिल वाळवी वय-22 वर्षे दोन्ही रा. कोठली ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून विचारपूस केलो असता त्यांनी सदर गुन्हा केले असलेबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच त्यांना अधिक विचारपूस केली असता सदर आरोपीतांनी एप्रिल-2024 मध्ये देखील रात्रीच्यावेळी एका इसमाला अडवून जबरीने पैसे हिसकावून घेतले आहे. त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 209/2024 भा.द.वि. कलम 394, 341 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडून 11 हजार 500 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आले असून आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील 8 आरोपी व 1 अल्पवयीन मुलाकडून एकूण 19 लाख 98 हजार 553 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, नंदुरबार जिल्ह्यातील 05 व बुलढाणा जिल्ह्यातील 01 असे एकूण 06 मालमत्तेविरुद्ध्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक श्री. मुकेश पवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
Tags:
गुन्हे/अपघात