लोकसभा निवडणुकीनंतर आता नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे वातावरण तापत असून दिनांक सात जून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तत्पूर्वीच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या प्रबळ दावेदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांनी पक्षनिष्ठा दाखवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या केवळ एका शब्दावर आपल्या उमेदवारी पासून बाजूला झाल्याचे कळते.
शुभांगी ताई पाटील या मूळच्या शिक्षक नेत्या असून. मागील गेल्या दहा वर्षापासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या शिक्षक प्रिय नेत्या आहेत. नुकत्याच मागील वर्षी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी करत प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी झुंज देत जवळपास 49 हजार मते मिळवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला होता. त्यांच्या कामाची हातोटी व धडाका पाहून एकाच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रथम उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती व त्यानंतर शिवसेनेतील महत्त्वाचे पद असलेले उपनेते पदाची देखील सहाच महिन्यात त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत शुभांगी ताईंनी पक्ष कार्यात स्वतःला झोकून दिले होते. मग त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील सुमारे आठ लोकसभा मतदारसंघात शुभांगी ताई यांनी जबाबदारीने प्रचार करून महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यात मोलाचे कार्य केले होते.
शिक्षक संघटनेत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष असल्याने संघटनेच्या माध्यमातून देखील त्यांनी राज्यभरातील हजारो शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील सुमारे 63,000 विना वेतन शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न त्यांनी सोडवल्या ने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात एक प्रामाणिक शिक्षक नेत्या म्हणून त्यांचे वलय निर्माण झालेले आहे. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात त्यांनी सुमारे 30000 शिक्षकांचे मोठे संघटन निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत आगामी शिक्षक मतदारसंघात त्या महा विकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे संपूर्ण राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात निश्चित मानले जात असतानाच. अचानकपणे नाट्यमय रित्या काँग्रेस पक्षाचे माजी आमदार गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव ऍड संदीप गुळवे यांनी काँग्रेस पक्ष सोडून उमेदवारीसाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिक्षक मतदार संघाचे आर्थिक निकष पाहता पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सहाजिकच शुभांगी ताई पाटील या नाराज होणे स्वाभाविक होते. व त्यामुळे त्या बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी सर्व शिक्षण क्षेत्रात व राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली होती. मीडियामध्ये तशा बातम्या देखील प्रदर्शित झाल्या होत्या. परंतु पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे परदेशात गेलेले असून जोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदेश देत नाही तोपर्यंत उमेदवारीचा निर्णय घेणार नाही या मतावर शुभांगी ताई पाटील या ठाम होत्या.
काल दिनांक 5 रोजी उद्धव ठाकरे प्रदेशातून परत आल्यानंतर शुभांगी ताई पाटील यांना मातोश्रीवर बोलावणे झाले. व शुभांगी ताई पाटील यांनी मातोश्रीचा आदेश मानत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली त्यावेळी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी शुभांगी ताई पाटील यांना एवढ्या वेळेस उमेदवारी साठी थांबावे अशी विनंती केली.या वेळी शुभांगी ताई पाटील यांनी मी उमेदवारी पासून बाजूला होईल पण मला माझ्या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आमदार व्हायचे होते त्यांच्या प्रश्नांचे काय? त्यावर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितले की येणारे सरकार आपलेच असेल व त्यावेळी मी तुमच्या माध्यमातून शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवेल असे आश्वासित केल्यानंतर शुभांगी ताई पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी पासून बाजूला झाल्याचे कळवले आहे.
शिक्षकां प्रती असलेली तळमळ व त्यासाठी एमपीएससी परीक्षा राज्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असताना शिक्षणाधिकारी पदाचा त्या करणाऱ्या शुभांगी ताई पाटील यांनी केवळ पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर आपल्या दहा वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यावर आणि केलेल्या मेहनतीवर पाणी सोडत कुठलाही विचार न करता पुन्हा एकदा आपल्या शिक्षक आमदारकीच्या स्वप्नाचा त्याग केला आहे. एक परिपक्व राजकारणाची चूनुक व शिवसेने प्रति पक्षनिष्ठा काय असते हे केवळ पक्षातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या खानदेश कन्येने आपल्या माघारी तून दाखवून दिलेले आहे...
आपल्या माघारी संदर्भात शुभांगी ताई पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांची तातडीने ऑन लाईन मीटिंग घेत चर्चा केली. आणि उद्या दि 07 रोजी या संदर्भात सकाळी 11 वाजता शिक्षक मतदार संघाची पुढील दिशा ठरवण्यासाठी धुळे येथे मीटिंग आयोजित केलेली असल्याचे कळविले आहे
Tags:
निवडणूक