पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शैक्षणिक समस्यांवर तत्परतेने सोडवण्यासाठी साकडे घातले. व तातडीने अंमलबजावणी करून घेतली. ठाणे - सत्यप्रकाश न्युज
आज दिनांक 18.07.2024 रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थीत होते.
पालघर जिल्ह्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यालयीन राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याचा आदेश दिले होते ते आदेश रद्द करावेत म्हणून आज कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आमदार निरंजन डावखरे, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या समवेत मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांची भेट घेऊन निवेदन दिले व घर भाडे थांबवलेला आदेश रद्द करण्याची मागणी केली, त्यानुसार सदर आदेश तात्काळ रद्द करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांना दिल्या.* *जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या दालनात शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना बोलवून , आत्ताच आदेश काढा असा आग्रह प्रकाश निकम व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी धरला त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी नियमित वेतन सुरु करण्याचे पत्रक काढून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे एक प्रत सुपूर्द केली, मुख्यालयीन राहणाऱ्या शिक्षकांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी न्यायमिळवून दिला.*
*पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या विविध शैक्षणीक समस्या सोडविण्याकरीता पालघर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संगिता भागवत यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्न मांडले आणि ते प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सुचना केल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछपत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचीव अरुण भोईर, पालघर जिल्हा समन्वयक विठ्ठल गोरे, पालघर जिल्हाअध्यक्ष महेश कुडू, रोशनी गावंड, प्रशांत रुकारी सर, अशोक तुंबडा, प्रितम घरत आणि अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधव उपस्थीत होते.*
पालघर जिल्ह्यातील" माझी सुंदर शाळा" पुरस्कार प्राप्त शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्व शिक्षक व शासकीय कर्मचारी यांच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, शिक्षणाधिकारी संगिता भागवत मॅडम यांचेही मनापासून आभार मानले.
Tags:
शैक्षणिक