शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन श्रेणीचे पत्र निर्गमित,शिक्षकांना लवकरच महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार.... शुभांगी पाटील.

धुळे सत्यप्रकाश न्युज 
    महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या राज्याध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते शुभांगी ताई पाटील यांनी राज्याचे शिक्षण संचालक  प्राथमिक व संचालक माध्यमिक याची आयुक्त कार्यालय पुणे येथे जाऊन शिक्षकांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अनेक समस्या बाबत  पुणे स्तरावर पाठपुरावा केला. या मध्ये राज्य सरकार दीं 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात वाढ केली आहे परंतु ती अद्याप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही या बाबत राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी व मा श्री चव्हने साहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ त्याबाबतचे पत्र निर्गमित करून घेतले तसेच. पुढील टप्पा देण्यासंदर्भात देखिल चर्चा करण्यात आली. तसेच खालील जिल्हा स्तरावरून माहिती गोळा करून ती पुणे  स्तरावरून मंत्रालय स्तरावर पाठवण्यात येईल व त्यानंतर 40, 60 ,80 असा टप्पा देण्यात येईल. असे संचालक स्तरावरून सांगण्यात आले. त्यानंतर राहिलेल्या अघोषित शाळा यांची जिल्हा स्तरावरून माहिती घेण्यात येत आहे. त्यानुसार ज्या शाळांचे नाव आलेले आहेत त्यांच्यासोबतच राहिलेल्या क्षेत्रीय स्तरावरील शाळांची पण माहिती मागविण्यात यावी म्हणजे यानंतर राज्यात कोणती शाळा अनुदानापासून शिल्लक राहणार नाही. यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच राहिलेले शालार्थ आयडी, शिक्षकांचे प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तात्काळ देण्यात यावेत या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ज्याप्रमाणे एक दोन जुलै ,13 सप्टेंबर रोजी च्या शाळांना ज्याप्रमाणे मागील कोणत्याही तीन वर्षाची पटसंख्या ग्राह्य धरून अनुदान देण्यात आले होते. त्याचप्रमाणे नव्याने 20, 40 व 60 या शाळांना तोच नियम लावून त्यांनाही टप्पा अनुदानासाठी पात्र करण्यात यावेत. कारण की अनुदान दिले असतानाही अनेक शाळा या अनुदानापासून आजही वंचित आहेत. त्यांच्याही अटी व शर्ती या एक-दोन जुलै व 13 सप्टेंबर च्या शाळा प्रमाणे करण्यात याव्यात यासंदर्भात संचालक साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच राहिलेल्या अपंग युनिटचे शिक्षकांची सुनावणी करून पात्र शिक्षकांचे याद्या मंत्रालय स्तरावर पाठवण्यात याव्यात. यासंदर्भात गोसावी साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच चार टक्के महागाई भत्त्याचे कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात काल बसून माननीय चवणे साहेब यांच्या सहीचे पत्र काढण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षकांना अशैक्षणिक काम ज्या ठिकाणी जास्त आहे ते कमी या संदर्भातही चर्चा करण्यात आली. तसेच पाच तारखेच्या आत सर्व शिक्षकांचे पगार निघावे या संदर्भातही निवेदन देऊन विनंती केली. संच मान्यता संदर्भात मागील वर्षातील राहिलेल्या असतील तर त्यांना सुद्धा तात्काळ संच मान्यता देण्यात याव्यात. अशा अनेक प्रश्नांवर माननीय पालकर साहेब संचालक यांच्याशी चर्चा करण्यात आली व अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post