येथील प्रसिद्ध साहित्यिक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व काव्य प्रेमी शिक्षक मंचच्या राज्य सदस्या सौ.जयाताई निंबाजी नेरे यांना अभिनव खान्देश प्रेरणादायी व जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून
सदर पुरस्कार २७ जून हा कै. सौ. नलीनी प्रभाकर सूर्यवंशी उपसंपादिका धुळे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गृहीणीपद सांभाळून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नारी शक्तीचा गौरव म्हणून ९ कर्तबगार महिलांना अभिनव खान्देश प्रेरणादायी व जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. संसारिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या वैयक्तीक छंद आवडीला बाजुला सारुन यशस्वी संसार करणाऱ्या धर्मपत्नी कै. सौ. नलिनी सूर्यवंशी यांच्या ४थ्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या साहित्याप्रती आवड म्हणून गृहीणीपद सांभाळून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यभरातील ९ कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारासाठी संपादकीय मंडळाने एकमताने निवड केली आहे यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील शिक्षिका व काव्य प्रेमी शिक्षक मंचच्या राज्य सदस्या सौ.जयाताई निंबाजी नेरे यांना जाहीर झाला असून
पुरस्काराचे स्वरुप- आकर्षक ट्रॉफी, मानाची शाल, दर्जेदार प्रमाणपत्र तसेच बुके ऐवजी बुक (पुस्तक) देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच धुळे येथे आयोजित होणार आहे. असे संस्थापक संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे.
सौ जयाताई नेरे यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पारिवारिक सदस्य, परिसरातील साहित्यिक, शिक्षकवृंद व हितचिंतकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहेत
Tags:
यश/निवड