नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दी एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथे 18 जुलै रोजी *अलुना सणानिमित्त* मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील एकूण 24 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण दहा विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत परीक्षक म्हणून शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख व सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इन्चार्ज श्रीमती मेघा पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या आयोजनात शाळेच्या उपशिक्षिका डॉक्टर श्रीमती कामिनी राणा -बेरी व उपशिक्षिका श्रीमती चंद्रकलाबेन लोटनभाई जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला . इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक इयत्ता दहावी अ ची विद्यार्थिनी अरझुमन असिफ शेख हिने मिळविला व द्वितीय क्रमांक इयत्ता दहावी ब ची विद्यार्थी जैनब साजिद आमलीवाला हिने मिळविला. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक सानिया सिराज मलिक हिने मिळविला व द्वितीय क्रमांक सुमैया रफिक मुल्ला या विद्यार्थिनीने मिळविला. शाळेचे प्राचार्य मा.श्री संजय कुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने, सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
Tags:
शैक्षणिक