नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दी एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथे 20 जुलै रोजी *गुरु पौर्णिमा* कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य मा.श्री संजयकुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, माजी उपप्राचार्य श्री सुभाष नीळ,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निलेशभाई प्रजापत होते.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्रीमती एकताबेन देसाई व श्रीमती पुजाबेन धोडिया होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेची विद्यार्थिनी गौरी जाधव हिने केली.कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती पूजन करण्यात आले.शाळेची विद्यार्थिनी हनीफा बलेसरिया हिने गुरु पौर्णिमेचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले. त्यानंतर इ. 10 वी, इ 11वी व इ 12वीच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेवर आधारित नृत्य सादर केले.कार्यक्रमात पुढे वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेवर आधारित नाटीका सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निलेशभाई प्रजापत यांनी गुरुचे आपल्या आयुष्यातील महत्व मनोगतातून व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थिनी स्वरांगी वशिष्ठ हिने केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी निहारिका अग्रवाल व भूमिका दर्जी यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात शाळेच्या उपशिक्षिका डॉ.श्रीमती कामिनी राणा- बेरी, उपशिक्षिका श्रीमती चंद्रकलाबेन जाधव, उपशिक्षिका श्रीमती बिनीताबेन शाह यांनी सक्रिय सहभाग घेतला. शाळेचे प्राचार्य मा.श्री संजय कुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने, सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
Tags:
शैक्षणिक