1) 1 जून 2024 पासून अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढीचा जीआर काढणे*
2) शेवटच्या वर्गाची पटसंख्या 2023- 24 पकडून अनुदान देणे
3) तीस दिवसात त्रुटी पूर्ण केल्या शाळांना राहिलेला टप्पा देणे
4) समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेणे*
आज वरील विषय मीटिंगमध्ये झाले, जुन्या पेन्शन साठी सुप्रीम कोर्टात सादर करण्यासाठी जो अहवाल तयार करायचा आहे, त्या अहवालामध्ये आमदारांना विश्वासात घेऊन दहा दिवसाच्या आत कोर्टाला अहवाल सादर करणे अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी केली, मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले आणि आदेश दिले
अंशतः अनुदानित शाळांचा वाढीव टप्पा जीआर तात्काळ काढा मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश दिले
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करणे, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, अघोषित शाळा अनुदान, 135 शाहू फुले आंबेडकर शाळा अनुदान देणे दिव्यांग शाळांना अनुदान आणि अन्य विषयांसाठी आमदार व अधिकाऱ्यांची समिती तयार करून तात्काळ निर्णय घ्यावे असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले
सर्व विषय मांडण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेश शिंदे, आमदार ज. मो अभ्यंकर, आमदार किशोर दराडे, आमदार मनीषा कायंदे मॅडम, माजी आमदार श्रीकांत देशपांडे,, दत्ता सावंत, उपस्थित होते
उर्वरित विषयांसाठी शिक्षण मंत्र्यांकडे उद्या बैठक होणार आहे
Tags:
शैक्षणिक