भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा समिती सुरत द्वारा सार्वजनिक गुजराती हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
  दिनांक १६/०७/२०२४, रोजी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा समिती सुरत द्वारा सप्टेंबर २०२३ मध्ये आयोजित झालेल्या भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रम
दी नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित , दी एन.डी.ऍण्ड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह ज्युनिअर कॉलेज नवापूर मध्ये आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री.संजय कुमार जाधव सर, यांनी भूषविले व कार्यक्रमात भारतीय संस्कृती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. 
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य आदरणीय श्री.कल्पेश भाई जोशी व श्री. पराग भाई ठक्कर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला,
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. श्री नरेंद्र पाटील सर यांनी प्रस्तावना द्वारे केली तदनंतर सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते व करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे प्राचार्य ,उपमुख्याध्यापिका, व पर्यवेक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
कार्यक्रमात शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती. कमलबेन परिख मॅडम यांनी बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढविला.
सदर परीक्षेत इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी , गुजराती हिंदी इंग्रजी व उर्दू माध्यमातून एकूण २७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सदर परीक्षेत विद्यार्थिनींची व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय होती. 
भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा समिती सुरत द्वारे एकूण 24 ट्रॉफी व प्रमाणपत्र शिवाय सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सहभागी शिक्षक बंधू व भगिनींना प्रमाणपत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन श्री महेश राठोड सर यांनी केले. 
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे प्राचार्य आदरणीय संजय कुमार जाधव सर उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख मॅडम 
उर्दू विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय जाहीद पठाण सर, यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा समिती सुरत द्वारे शाळेला ट्रॉफी मिळाली. 
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. कामिनीबेन बेरी मॅडम, श्रीमती. बिनता शाह श्री. महेश राठोड 
शिक्षकेतर कर्मचारी श्री रणजीत जाधव , श्री. सागर पाटील, श्री जुबेर शेख, श्री सचिन पाटील यांचे सहकार्य लाभले 
कार्यक्रमाच्या शेवटी आदरणीय प्राचार्य श्री. संजय कुमार जाधव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम यशस्वी करणारे शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post