येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूल मध्ये चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.
दिनांक 18/07/2024 रोजी कला भारती बाल कला विकास संस्था, पुणे द्वारा आयोजित एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर आणि सेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालयात `चित्रकला आणि सुंदर हस्ताक्षर' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रकला स्पर्धेत इयत्ता 5 ते 10 च्या एकूण 114 विद्यार्थ्यांनी तर 39 विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत असे एकूण 153 विद्यार्थीनी उत्साहाने सहभाग घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमात नवापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय श्री शिरीषभाई शाह व मानदमंत्री श्री सोएबभाई मांदा यांची विशेष उपस्थिती होती. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय कुमार एल.जाधव सर उपमुख्यद्यापिका सौ.कमलबेन परीख व कार्यक्रम समन्वयक श्री.नैनेश कुमार डी. पंचोली सर, प्रितीबेन वळवी मॅडम व फरजाना शेख मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
Tags:
शैक्षणिक