आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व आमदार जयंत आजगावकर यांनी राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना टप्पा वाढचा जीआर तात्काळ निघावा व जुनी पेन्शन बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सह्याद्री अतिथी ग्रहावर प्रचंड गर्दीमध्ये भेट घेतली.
भेटी दरम्यान गर्दीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोडक्यात ऐकून घेतले व लगेच प्रधान सचिव शिक्षण श्रीमती. कुंदा मॅडम यांना फोन केला
बैठकीत ठरल्याप्रमाणे अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ जीआर तात्काळ का, काढला नाही? असे विचारले. त्यांनी समीर सावंत यांना जीआर काढण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत असे शिक्षण सचिव कुंदा मॅडम यांनी सांगितले,त्यावर उद्या आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार आजगावकर हे समीर सावंतांना भेटतील, त्यांनी काय काम केले त्याची माहिती द्यायला फोन करून सांगा असे मुख्यमंत्री महोदयांनी सचिवांना सांगितले
तसेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त 26 हजार शिक्षकांना आपण पेन्शन लागू करणार आहोत, त्याची 7 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, 2046 पर्यंतचा आर्थिक बोजाचा आकडा सांगितला होता, त्यावर समिती नेमली आहे, त्याचे काय झाले?, 7 तारखे अगोदर सर्व अहवाल आमदारांसोबत बसून लवकर तयार करा, सुप्रीम कोर्टाने शिक्षक- शिक्षकेतरांच्या बाजूने निर्णय देईल, मग शासनाला त्याचा काय उपयोग होईल, अशा शब्दात माननीय मुख्यमंत्री सचिवांना बोलले
Tags:
शैक्षणिक