येथील श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री मिलिंद वाघ तर प्रमुख अतिथी श्री दीपक मंडलिक ,श्रीमती मेघा पाटील कनिष्ट विभाग प्रमुख , श्रीमती जयश्री चव्हाण, श्री गणेश लोहार,श्री सी एस पाटील , श्री टी आर जाधव, श्री एस एस ख़ैरनार, श्रीमती कविता खैरनार,श्री एम एस सोनवणे श्री डी एम खैरनार ,दिपमाला गावीत मंचावर उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गुरूंना शुभेच्छा पर संदेशात गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. तसेच यानिमित्ताने १६ विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल आपले विचार व्यक्त केले. गुरु हेच आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत हा मोलाचा संदेश अनेक विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून दिसून आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री मिलिंद वाघ यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त व योग्य वर्तन याबद्दल मार्गदर्शन केले .तसेच मातृदेव व पितृदेव यांचा गुरु म्हणून आपल्या आयुष्यातील स्थान स्पष्ट केलं. आपले आयुष्य उज्वल करण्यासाठी गुरु हे आपल्याला दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक असतात असे सांगितले. श्रीमती जयश्री चव्हाण, श्री सी एस पाटील यांनी विद्यार्थ्याना शिस्त व वर्तन या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रीटिंग कार्ड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण श्री डी टी आर जाधव श्रीमती कविता ख़ैरनार व श्रीमती दीपमाला गावित यांनी केले.
Tags:
शैक्षणिक