नवापूर सत्यप्रकाश न्युज
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नवापूर शहरासह तालुक्यात आज वरूण देवतेचे आगमन झाले ते देखील साधे सुधे नसुन अत्यंत तीव्र गतीने गुरुवारी रात्री 11 वाजेपासून पावसाची सुरुवात झाली तर सकाळपासून सर्वीकडे पावसाने थैमान घातले होते.
धीरे धीरे सकाळ पर्यंत नवापूर शहरासह तालुका जलमय झाला होता राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे व माती असल्याने महामार्ग ठप्प झाला होता व पूरग्रस्त परिस्थिती झाली होती शहरातील रंगावली नदिकिनारयासह प्रभाकर कॉलनी, राजीव नगर ,भगतवाडी , इंदिरानगर सह महामार्गाजवळील सर्व भाग जलमय झाला होता अर्ध्या रात्री नागरिकांना सुरक्षित जागेवर पोहचविण्यात आले होते तसेच तालुक्यातील बर्याच गावांचा संपर्क देखील तुटला होता.
रात्री तीन वाजेचा सुमारास प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप यांना बातमी कळताच कार्यालयात दाखल होऊन आपले कार्यतत्परता दाखवली व शहरासह तालुक्यात घटनास्थळी भेट दिली महामार्गावर प्रचंड पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून आज शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली होती शिक्षकांनी मात्र आपले कर्तव्य बजावत पूर्णवेळ शाळेत उपस्थिती होती.
तसेच सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील चिंचपाडा व कोळदा रेल्वे रुळावर पाणी घुसल्याने रेल्वे रुळावर पुराचे पाणी, सुरत भुसावळ मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती म्हणून 7 गाड्या वळविल्या तर 2 गाड्या रद्द, झाल्यामुळे 7 तासापासून प्रवासी ताटकळत बसले होते
नंदुरबार रेल्वे स्थानकावर सकाळी साडेपाच वाजेपासून अमदाबाद बरोनी एक्सप्रेस थांबली सात तासापासून प्रवासी ताटकळत, सकाळी साडेपाच वाजेपासून सुरत भुसावळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या गेल्या होत्या यात
• 12656 चेन्नई ते अहमदाबाद एक्सप्रेस भुसावळ खंडवा मार्गे, 07055 काचीगुडा ते हिसार ही एक्सप्रेस इटारसी भोपाल मार्गे, 12834 हावडा ते आमदाबाद ही एक्सप्रेस रतलाम मार्गे वळवल्या• 15068 बांद्रा ते गोरखपुर, 12833 आमदाबाद ते हावडा, 19483 आमदाबाद ते बरोनी, 20824 अजमेर ते पुरी या एक्सप्रेस भरूच मार्गे वळवल्या• उधना नंदुरबार आणि नंदुरबार ते उधना जाणारी मेमो रद्द करण्यात आली होती.
या रेल्वे मार्गावर रेल्वे विभागाने युद्ध पातळीवर जवळ जवळ 100 कामगारांनी तब्बल 8 तासात सदर रेल्वे मार्ग सुरळीत सुरू झाल्या नंतर रेल्वे प्रशासन व कामगारांचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले.
Tags:
पर्यावरण