जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम भागात अनेक ठिकाणी अद्यापही रस्ते, वीज नसल्याचे चित्र आहे. त्यातच राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगितले आहे. दरम्यान जिथे रस्ते विजच नाही तिथे मोबाईल नेटवर्क मिळणे. मोठी दुरापस्त गोष्ट आहे. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तिनसमाळ या गावात मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्या गावाजवळ असलेल्या टेकडीवर गुजरात राज्याचे मोबाईल नेटवर्क मिळते. त्यामुळे टेकडीवर जाऊन मोठ्या प्रमाणावर महिला ऑनलाईन फॉर्म भरत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे शासन डिजिटल इंडियाची गोष्ट करते मात्र दुसरीकडे नेटवर्क अभावी उंच टेकड्यांवर जाऊन फॉर्म भरावा लागतो हे दुर्देवी आहे. सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे अनेक ऑनलाईन कामांना खोळंबा निर्माण होतो. अशातच गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असलेल्या दुर्गम भागातील तिनसमाळ वा गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी थेट एका उंच टेकडीवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावे लागत आहे. या गावासारखे अनेक गावांची ही स्थिती आहे
बहिणींसाठी युवक सरसावले
तिनसमाळ येथे दुर्गम भाग पाहता स्थानिक संस्था जय जोहार फॉऊडेशन व उमेद कडून एक दिवसीय शिबिर ठेवण्यात आले होते. नेटवर्क ची सोय पाहता एका टेकडीवर गुजरात राज्यातील रोमिंग नेटवर्क मिळते. त्या ठिकाणी जाऊन सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून ऑनलाइन फॉर्म भरले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती अॅप वापर करून फॉर्म भरले. वेबसाईट लोड घेत असल्यामुळे तासनतास वाट पाहत बसावी लागते. त्यामुळे अशिक्षित आदिवासी महिलांचे कागदपत्रे एकत्र करून त्यांना ऑफलाईन फॉर्म भरून पुन्हा ऑनलाइन भरण्यासाठी मनिषा पावरा मदत करत होत्या, तर ऑनलाइन फॉर्म लक्ष्मण पावरा यांनी मोबाईल वर भरले.
त्यामुळे अनेक टेकडयांवर महिला तिथे बसून अर्ज भरत आहेत. सकल भागातून धडगाव तालुक्यात बदली होऊन गेलेले शासकीय कर्मचान्यांनाही अनेकदा नेटवर्कसाठी टेकड्यांवर चढ़ावे लागते. त्यानंतरच घरच्यांशी संपर्क होऊ शकतो. देशात डिजिटल इंडियाचा नारा देत असताना राज्यातील दुर्गम भागात टेकडीवर नेटवर्कच्या शोणासाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे.
Tags:
सामाजिक