दि.25 जुलै रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यावर अस्मानी संकट ओढवले होते...या संकटामुळे संपूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले होते.. ह्या सर्व परिस्थितीतून लोकांना सावरण्यासाठी तालुक्याचे दानशूर व्यक्तिमत्त्व मा.भरतभाऊ गावित, धनंजयदादा गावित व नवापूर सुमाणिक गावित परिवार पुढे सरसावला व पूरग्रस्त बाधित कुटूंबियांना किराणा किट वाटप करून आपले कर्तव्य पार पाडले.
एवढयावर न थांबता नवापूर तालुका हा माझा परिवार आहे आणि माझा परिवार अडचणीत आहे, या अडचणीतून परिवाराला बाहेर काढण्यासाठी मा.भरतभाऊ गावित यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.श्री. अनिल पाटील साहेब यांची तात्काळ भेट घेतली व नवापूर तालुक्यातील पूरग्रस्त बाधित कुटूंबियांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी या संदर्भाचे लेखी निवेदन दिले व मा.मंत्री महोदय यांना विनंती केली की, अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यांना शासनाकडून त्वरित मदत मिळाल्यास त्यांचे जीवन सुरळीत होण्यास मदत होईल. याप्रसंगी युवा उद्योजक धनंजय (धनुदादा) भरत गावित उपस्थित होते.
Tags:
सामाजिक