शिक्षण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांनी लुटला सांस्कृतिक दिनाचा आनंद

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
  येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व ए एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत सांस्कृतिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांची उधळण केली. विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित व्हावे व आत्मविश्वासाचे बळ यावे यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी  शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष   प्राचार्य एम एस वाघ  सर होते. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली  कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती मेघा पाटील  माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री डी एम मंडलिक व सर्व शिक्षक बंधू भगिनी  व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रीमती कविता प्रकाश खैरनार यांनी केले.   याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, गीत गायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य यामध्ये पोवाडा, गुजराती गरबा, राजस्थानी घूमर, कोळी नृत्य असे विविध  कार्यक्रम सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

Previous Post Next Post