जिल्हास्तरिय किक बॉक्सिंग स्पर्धेत नारीशक्ती युवती मंडळ क्लासच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     येथे नंदुरबार जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन व सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
मा.ना.अजितदादा पवार साहेब
ह्यांच्या 64 व्या वाढदिवसाच्या निमित्त येथील सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूल येथे जिल्हास्तरिय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   सदर स्पर्धा वय वर्ष 6 ते 17 वयोगटातील होत्या. तसेच जिल्हास्तरिय किकबॉक्सिंग स्पर्धेत प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिर च्या चिमुकल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकून  शाळेचे नाव उंचविले तसेच द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकून सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूल ने मिळविला व तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकून पारितोषिक नारीशक्ती युवती मंडळ क्लास नवापुर तालुका टीम ने पटकाविला सदर जिल्हास्तरिय किकबॉक्सिंग स्पर्धेत एकुण 70  विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. त्यात नवापूरच्या नारीशक्ती  युवती मंडळ क्लासच्या एकूण आठ विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला त्यात सर्वच्या सर्व विद्यार्थिनी चमकदार कामगिरी करत सर्वांनी गोल्ड मेडल प्राप्त केले सर्वांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले स्पर्धेतील पंच म्हणून साई पानपाटील , आर्यन वादवानी , हितेश जैन , समीर सर , लकी यादव ,विशाल सोनवणे यांनी
काम पाहिले.सूत्र संचालन संतोष मराठे यांनी केले तर आभार ज्योती चौधरी यांनी मानले 
 गोल्ड मेडल विजेत्यांची नावे 
1 मीनाक्षी सिंग 2 संजना सिंग 
3 आरोही सिंग 4 कृपाल प्रजापत 
5 कृष्णा राणा 6 राज वाघ 7 सोहम बळवी 
8 पुष्कर कोळी

Post a Comment

Previous Post Next Post