सुरत येथे संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा दिनानिमित्त अभिवादन

सुरत सत्यप्रकाश न्युज 
    येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे दिनांक 2/8/2024/ शुक्रवार रोजी श्री संत नामदेव महाराज यांचा ६७४ वा
समाधी संजीवनी पालखी सोहळा संपन्न झाला 
   यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश ताराचंद मेटकर व प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.म.संसथेचे विश्वस्त  ज्ञानेश्वर भांडारकर, गुजरात राज्य संघटक  चंद्रकांत नामदेव शिंपी,तसेच आर.एस.पी कमांडर  मनिलाल शिंपी  सोबत नटवरलाल वर्मा, विशेष अतिथी म्हणून सुरत महानगरपालिका चे डेप्युटी मेयर डॉ. नरेंद्र पाटील , सुरत जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश सोनवणे,सुरत जिल्हा महिला अध्यक्षा सौ.संगिताताई जगन्नाथ बोरसे,, स्थानिक महिला अध्यक्षा सौ. विजया ताई खैरनार, युवा अध्यक्ष  जितेन्द्र बागुल व पदाधिकारी तसेच कार्यकारी मंडळ, महिला कार्यकारी मंडळ उपस्थित होते 
    संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा फोटो प्रतिमा पालखीत ठेऊन पूजन करून
भजनी मंडळाच्या निनादात मुख्य रस्त्यावर वरून संत नामदेव महाराज यांचे मंदीरात पूजा अर्चा करून मिरवणूकीची  .सांगता
समाज मंदिर निलगिरी सुरत येथे करण्यात आली. सुरत येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी सोहळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला कार्यक्रमात सर्व समाज बांधव व कार्यकारी मंडळ व नवयुवक मंडळ व महिला मंडळ व भजनी मंडळ यांनी यथाशक्ती आपले योगदान दिले.
 प्रमुख पाहुणे  मणिलाल शिंपी , ज्ञानेश्वर भांडारकर व डेप्युटी मेयर सुरत महानगरपालिका डॉ. नरेंद्रजी पाटील सुरत शहर डेप्युटी मेयर यांचे उपस्थिती होती . आपल्या मनोगतात चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन व भारत सरकारच्या नवीन योजना,वाहनवव्यवहार संबंधित सुरक्षा विषयावर उत्तम प्रकारे समजावून सांगितले.   विजय नाना बिरारी यांनी सुद्धा सुरत शहर कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमात हजर राहू शकलो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाम विश्व सहसंपादक श्री नरेंद्र यशवंत खैरनार यांनी केली. तर व्यासपीठावरील व्यवस्था  किशोर शिंपी व श्री किशोर पवार यांनी सांभाळली. 
कार्यक्रमाचे शेवटी श्री प्रकाश ताराचंद मेटकर यांनी सर्वांचे आभार मानले 
आज रोजी सुमधुर महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचा लाभ हजारो समाज बांधवांनी घेतला.व मनापासून आनंद व्यक्त केला.सदर कार्यक्रम सफलता पूर्वक पार पाडण्यासाठी सर्वश्री नानासाहेब इसई, श्याम मेटकरी, नितीन मेटकर,लोटन शिंपी, रमेश सोनवणे, बंसिलाल जगदाळे, आत्माराम संदानशिवे, सुरेश जगताप, ,सुधीर कापडणे, कैलास बागुल, राजेन्द्र सोनवणे, राजेन्द्र देवरे, प्रकाश कापूरे व संपूर्ण स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी  परिश्रम केले. 
वृत्तसहकार्य -श्री नरेंद्र यशवंत खैरनार सर सहसंपादक नामविश्व सुरत.

Post a Comment

Previous Post Next Post