तालुक्यातील कोळदा ते पार्टी गावादरम्यान राहुल शांत गावित याच्या घरात नवापूर पोलिसपथकाने छापा टाकून कायदेशीर कारवाई केली. घरातून एक लाख ४८ हजार ७९० रुपयांची देशी, विदेशी दारू व बिअर मिळून आली. मुद्देमाल जप्त करून राहुल गावित याच्याविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवापूर पोलिसांना ४ ऑगस्टला मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोलदा ते पाटी गावादरम्यान राहुल शांतू गावित (वय ३४, रा. कोळदा, ता. नवापूर) याने देशी-विदेशी दारू व बिअरचा मद्यसाठा अवैधरीत्या गुजरातमध्ये चोरटी मागनि विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याअनुषंगाने नवापूर पोलिस पथकाने ४ ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास राहुल गावित याच्च्या घरात छापा टाकला. एका खोलीत देशी-विदेशी दारू व बिअरचा मद्यसाठा मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल दोन पंचांसमक्ष जागीच जप्त करण्यात आला. घटनेबाबत पोलिस शिपाई रवींद्र हरी भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात दारूबंदी गुन्हा दाखल झाला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार सुभाषचंद्र वसुले, पोलिस शिपाई विक्की वाघ, दीपक पाटील, रवींद्र भोई यांच्या पथकाने केली.
Tags:
गुन्हे/अपराध