येथे amozone कंपनी आणि दिलासा कार्ड सेवाभावी सस्थे च्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लाम पुरा, प्रभाकर कॉलनी, सुभाष नगर, इदिरा नगर, खाकरफळी भागातील पूरग्रस्ताना ३०० अन्नाधान्य किट चे वाटप आमदारं शिरीष नाईक यांच्ये हस्ते वाटप करण्यात आले होते
नवापूर तालुक्यात २५ जुलै २०२४ ला अतिवृष्टी मुळे नदी नाल्या ना पूर आला होता यावेळी नवापूर शहरात नदी नाल्या काठी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरता पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य अन्नधाण्याची नासाडी झाली होती
खाकरफळी, इस्लामपूरा, सुभाष नगर, प्रभाकर कॉलनी, अश्या अनेक भागात सहा ते सात फूट पाणी शिरले होते यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता
पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते
पूरग्रस्ता साठी amazone कंपनी आणि दिलासा कार्ड या सेवा भावी सस्थे च्या संयुक्त विद्यमाने दि. ०६ ऑगष्ट २०२४ला नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना ५ किलो तांदूळ, ५ किलो पीठ, दोन किलो रवा एक किलो तेल, तिखट,मीठ मसाला असे एकूण जवळ जवळ १६ किलो वजनाचा शिदा असलेली किट तालुक्याचे आमदार शिरीष नाईक,, सेवा निवृत्त उपायुक्त,अरविंद वळवी,मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, सहायक पोलीस निरीक्षक साबळे साहेब, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील, दिलासा कार्ड सेवा भावी संस्थेचे पुष्कराज तायडे चंद्रकांत नगराळे आदी मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले होते
या वेळी आमदार शिरीष नाईक यांनी amazon कंपनी आणि दिलासा कार्ड संस्थेचे आभार मानले होते आणि लवकरच संस्थेच्या पदाधिकारी याच्याशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानी च्या ठिकाणी मदत पोचवण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते आजच्या किट वाटप कार्यक्रम यशस्वी करण्या साठी माजी नगरसेवक फारुक शाह आणि नवापूर दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले यांनी परिश्रम घेतले होते
Tags:
सामाजिक