करक्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व तथा टॅक्स गुरू डॉ. सीए गिरीश जी आहुजा

कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
      "वक्त बदल रहा है !!"अगदी खरोखर ...
काळ बदलतो आहे.. आणि या बदलत्या काळाबरोबर करदात्यांना सुद्धा बदलावे लागणार आहे.
  आज आयकर विभागाकडे करदात्यांच्या एकूण एक मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा तपशील अगदी सहजपणे उपलब्ध
झालेला आहे.
     करदाता करीत असलेला व्यवसाय, 
त्याच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल, 
आर्थिक वर्षात त्याने खरेदी केलेली मालमत्ता तपशील, त्याचप्रमाणे शेअर्स,म्युच्युअल फंड अथवा युनिट्स मधील गुंतवणूक,खरेदी केलेली वाहने, बँकेतून काढलेली किंवा जमा केलेली रक्कम, आदी सर्वच  प्रकारचा तपशील आज आयकर विभागाकडे सहजगत्या
प्राप्त होत असल्याने, या पुढील काळात लवकरच आयकर विभागाला अजूनही मोठी माहिती उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाच प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट डॉ.गिरीष आहुजा यांनी केले.
   कोपरगाव येथील जुन्या पिढीतील नामवंत व्यापारी, तथा सामाजिक क्षेत्रातील सर्वदूर परिचित व्यक्तिमत्व असलेले 
कै. धनराजशेठ भनसाळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ.सीए श्री गिरीष आहुजा बोलत होते.
   कोपरगाव येथील "सोनतारा भन्साळी ट्रस्ट" तसेच " समता नागरी सहकारी पतसंस्था"  यांच्या विद्यमाने कोपरगावातील, 
व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकौंटंट, 
कर सल्लागार,इंजिनिअर्स, तसेच 
समस्त नागरिकांसाठी 
"भन्साळी परिवारातील उद्योजक श्री अरविंदशेठ भन्साळी, श्री संजयजी भन्साळी "तसेच "समता पतसंस्थेचे श्री काकासाहेब कोयटे " यांनी 
या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
केंद्रीय अर्थसंकल्पातील आयकर विषयाचे संदर्भातील नियोजित होऊ घातलेल्या तरतुदी, भांडवली स्वरूपाच्या नफ्यावरील कर आकारणी, या बाबतीत येथून पुढे करदात्यांनी अतिशय खबरदारी घेण्याचे आवाहन करीत, आपले आयकर विवरणपत्रक दाखल करताना करदात्यांकडून होणाऱ्या चुका, 
याबाबत त्यांना सजग रहाण्याचे 
आवाहन केले.  
   करदात्यांनी  आता काळा बरोबर बदलण्याची गरज निर्माण झालेली असून, जुनी करपद्धती व नवीन करपद्धती यामधील तफावत व कराचे बाबतीत दिलेल्या सवलतींचा मागोवा घेताना, त्यांनी दोनही पद्धतीने करपात्रता निश्चित करताना करदात्यांनी कोणती काळजी घ्यावी याची देखील माहिती दिली.कोपरगावातील
"भन्साळी परिवार व समता परिवाराच्या सहकार्यामुळे"  एक अतिशय सुंदर व माहितीपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे सौभाग्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post