नवापूर ते गुजरात राज्यातील सोनगड दरम्यान फक्त दोन अधिकृत बस थांबे आहेत. त्यात हॉटेल राज व योगेश या व्यतिरिक्त जर कुठल्याही अनधिकृत बस थांब्यावर बस थांबत असेल तर त्या चालक वाहकांची तक्रार करावी. अशी मागणी प्रवासी राजा दिननिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रवाशांनी केली. यावर संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल असे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगितले.. बस स्थानकाची अवस्था, आसन व्यवस्था, पंखे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, खड्डे, बसेसची वाईट स्थिती, नादुरुस्त बसेस लांब पल्ल्यावर, वेळा न पाळणे आदी गाऱ्हाणे प्रवाशांनी मांडले. गिते यांनी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वस्त केले. वाहतूक अधीक्षक वासुदेव देवराज, व्यवस्थापक विजय पाटील, मंगेश येवले, मनोज बोरसे, मयूर सिंधी, गोविंद मोरे, रवी सोनवणे, रामू गिरासे आदींसह नागरिक उपस्थित होते.
Tags:
सामाजिक