नवापूर तहसिल कार्यालय येथे कृषी विभाग मार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   माटल्याची भाजी, अंबाड्याची भाजी बांबूचे कंदमूळ, कोई ची भाजी, नागली भाकर, आळूची पान शेवग्याची भाजी, अमरक, आरि कंद, कंटोरले, केहवाली, टिंडा, शेवग्याच्या पाला, लाल करवंदे, इंद्रायणी तांदूळ, वाडा कोलम तांदूळ, फुरसणी इत्यादी रानभाज्यांचे प्रदर्शनातं ठेवण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाला आलेल्या अधीकार्यांनी रानभाज्या मधून बनलेल्या खाद्यपदार्थाचे आस्वाद घेतला..
     दि १४ ऑगस्ट महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रनाव (आत्मा) रानभाजी महोत्सव २०२४ तालुका कृषी अधिकारी नवापूर मार्फत आयोजित करण्यात आले होते, हा कार्यक्रम नवापूर तहसील कार्यालय येथील हॉल - येथे आयोजित करण्यात आला होता. रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबीता गावित, नवापूर तालुक्याच्या नवनियुक्त तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या प्रमुख उपस्थित झाले.
राज्य शासनाने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत रानभाजी महोत्सवाच्या करण्याच्या सूचना सर्व तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहेत.
   रानभाज्यांचे जास्तीत जास्त उत्पादन हेपावसाळ्यात होत असते, रानभाज्या या जंगलात, शेतकऱ्यांच्या बांधावर नैसर्गिकरीत्या उगवतात त्याची ओळख सर्वसामान्य ग्राहकाला व्हावी व त्यांच्या रोजच्या जेवणात त जास्तीत जास्त वापर वाढावा या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी उपस्थितांना दिली.
   सदर कार्यक्रमाला नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास देवरे साहेब, नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, संजीवन सन्यासी तालुका अभियान व्यवस्थाक उमेद संघटना, अरविंद गावीत तालुका व्यवस्थाक उमेद आदी कृषी विभागाचे कर्मचारी व तालुक्यातील विविध बचत गटाच्या महिला मोठ्य संख्येने उपस्थित होत्या त्यात राधा महिला स्वयं सहाय्यत समूह कामोद, लक्ष्मी महिला स्वयं सहाय्यत समूह हळदानी, इंदिरा महिला स्वयं सहाय्यत गनाडी, हिरकणी महिला ग्राम संघ बालआमराई, सरस्वती महिला ग्राम संघ बिलबारा, शांती महिला ग्राम संघ, डोकारे महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post