नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दी एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथे 15ऑगस्ट रोजी *स्वातंत्र्य दिवस* कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात
ध्वजवंदन डॉ. स्वप्निल गावित, नेत्र विशारद ,नोबल हॉस्पिटल, नवापूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य श्री कृष्णकांतभाई दलाल, श्री कल्पेशभाई जोशी, श्री परागभाई ठक्कर,श्री राजूभाई अग्रवाल, , नवापुरातील ज्येष्ठ नागरिक श्री.नेमीचंद काका अग्रवाल, श्री निलेश प्रजापत ,श्री आशिफ शेख, प्राचार्य श्री संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परिख मॅडम,पर्यवेक्षक श्री फारुख पटेल सर उपस्थित होते. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच विविध देशभक्तीपर गीतांवर उत्कृष्ट नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जी एच मणियार व गीताबेन राजपूत यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी श्रीमती निर्जला सोनवणे, श्रीमती चंद्रकला जाधव बिनिता शहा, श्री जितेंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, पुणे द्वारा आयोजित परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या परीक्षेत शाळेतील एकूण 105 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 89 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत
प्रथम क्रमांक पटेल गौरव सुरेश या विद्यार्थ्याने मिळविला. त्याला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.द्वितीय क्रमांक प्रजापत देवांशू अनिलभाई या विद्यार्थ्यांचा आला. त्याला सिल्वर मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.तिसरा क्रमांक मन्सुरी मंतशा मुख्तार या विद्यार्थिनीचा आला. तिला ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
श्री विपुलभाई प्रजापत यांना भूगोल उपक्रमशील शिक्षक अवार्ड प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच इतर उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेत दिनांक
14/08/2024 रोजी रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा विषय स्वतंत्रता दिवस हा होता. या स्पर्धेत आठवी ते दहावी या वर्गातील एकूण सात ग्रुप व इयत्ता अकरावी व बारावी वर्गातील एकूण आठ ग्रुप सहभागी झाले होते. रंगोली स्पर्धेसाठी श्रीमती कामिनी राणा व बिनिता शहा यांनी मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून उपमुख्याध्यापिका कमलबेन परीख व सीमा पाटील मॅडम यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शाळेचे प्राचार्य मा.श्री संजय कुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने, सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
Tags:
शैक्षणिक