नाशिक येथे संपन्न झालेल्या मराठी विज्ञान परिषद मुंबई , आयोजित -राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर ,ठरले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकाचे मानकरी....

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
             येथे मराठी विज्ञान परिषद मुंबई , आयोजित -राज्यस्तरीय  विज्ञान एकांकिका  स्पर्धा नाशिक येथे दि -26 सप्टेंबर 2024,वार -गुरुवार रोजी संपन्न झाल्यात.
 या स्पर्धेत नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती प्र.अ.सोढा  सार्वजनिक  मराठी हायस्कुल व हाजी ए.एम.व्होरा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर जिल्हा नंदुरबार संघाच्या विद्यार्थ्यांच्या 
फुटप्रिंट्स या एकांकिकेने द्वितीय बक्षीस प्राप्त केले.
    सदर एकांकिकेचे लेखन शाळेतील शिक्षक मनोज पाटील यांनी तर दिग्दर्शन- श्री दर्शन अग्रवाल  व मनोज पाटील यांनी केले तसेच संगीत ,नेपथ्य, वेशभूषा सर्व मनोज पाटील  बघितले.संघासोबत महिला शिक्षिका श्रीमती कविता खैरनार यांनी सहभाग नोंदविला.
    या संघात चेतन प्रकाश खैरनार यांने मुख्य भूमिका होती तर प्रतिक्षा नांदेडकर ,जागृती महाले नंदिनी पाटील,प्रतिभा निकुंभ जयसेंजल गावीत,देवांश पाटीलराज पाटील,
प्रीती गावीत,कनिष्का परदेशी आदि सहभागी होते
   विजेत्या संघाचे कौतुक व अभिनंदन संस्थाध्यक्ष  विपिन भाई चोखावाला कार्याध्यक्षा श्रीमती शितलबेन वाणी उपाध्यक्ष  शिरीष भाई शहा ,सचिव  राजेंद्र भाई अग्रवाल, कोषाध्यक्ष  सतीश भाई शहा तसेच  संचालक मंडळाचे सर्व सदस्य व शाळेचे प्राचार्य  मिलिंद वाघ  उपमुख्याध्यापक  नारायण मराठे ,पर्यवेक्षक  दीपक मंडलिक सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती मेघा पाटील आणि सर्व शिक्षकबंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात 

Post a Comment

Previous Post Next Post