राष्ट्रीय जनसेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक खैरनार रा.मुंबई बरेच दिवसांपासून शिंपी समाजाच्या व्हाॅट्स अप ग्रुप वर शिंपी समाजाच्या राष्ट्रीय संस्था व पदाधिकारी यांचेविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करीत आहे.याचे उत्तरादाखल अशोक खैरनार यांना संस्थेने व्हाॅट्स अप मेसेज द्वारे जाब विचारला असता याचा राग येवून अशोक खैरनार यांनी संस्थेचे सचिव प्रमोद शिंपी यांचे विषयी शिंपी समाजाच्या व्हाॅट्स अप ग्रुपवर अंत्यंत आक्षेपार्ह स्वरूपात बदनामीकारक लिखाण केले असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.प्रमोद शिंपी यांचे फिर्यादीवरून अशोक खैरनार यांचे विरोधात चाळीसगाव पोलीस स्टेशन ला कलम ३५१(२) ३५१ (३) व ३५६ (३) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्रमोद शिंपी सचिव -अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर समाज मध्यवर्ती संस्था यांनी दिली आहे.
Tags:
गुन्हे/अपराध