श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम.व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापुर ,जि.नंदुरबार.
Eco Club (इको क्लब)अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत प्लास्टिकचा वापर सोडा याबाबत जनजागृती करण्यात आली.
प्लास्टिकचा वापर ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे, परंतु त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आपल्याला नकारात्मकपणे प्रभावित करत आहेत.कापडी पिशव्यांचा वापर करून आपले पर्यावरण स्वच्छ राहिल्यास व प्लास्टिकचा वापर कमी होण्यास मदत होईल.
“प्लास्टिकचा वापर सोडा,
कापडी पिशव्या वापरा”
अशी घोषवाक्ये विद्यार्थ्यांनी तयार केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री मिलिंद वाघ तर प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे होते. तर श्री दीपक मंडलिक ,श्रीमती मेघा पाटील कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.श्रीमती जयश्री चव्हाण यांनी प्लॅस्टिकला पिशवीला पर्याय कापडी पिशवी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः व आपल्या परिवाराने वापरण्याचा निश्चय करावा असे सांगितले.डॉ.योगिता पाटील यांनी परिसर स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन केले.श्री एम एस सोनवणे यांनी घोषवाक्य स्पर्धेचे व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. याप्रसंगी श्री एन आर गावीत,श्री सोनू गावीत व इको क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्लास्टिकचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे, परंतु त्याच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्यामुळे झाडे, प्राणी,निसर्ग,सूक्ष्मजीव ,पर्यावरण यावर घातक परिणाम होत असून त्याचे विघटन होत नसल्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र प्रदूषणाचा भस्मासुर मोठ्या प्रमाणात पसरत चाललाय; म्हणून कापडी पिशवी आपण वापरावी व पर्यावरण रक्षणास हातभार लावावा.असा संदेश प्राचार्य श्री मिलिंद वाघ यांनी दिला.
Tags:
शैक्षणिक