जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नाशिक विभागीय एस.एस.सी. एच. एस. सी. बोर्डाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांच्याकडे देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसापासून हे पद रिक्त असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिलांचा प्रश्न उपस्थित झालेला होता. श्री.कदम यांनी मंगळवारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यभार स्वीकारून आपल्या कामकाजाला सुरुवात केली.
जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी डॉ. मच्छिंद्र कदम यांनी नियुक्तीचे आदेश मिळाल्यानंतर दि. ३ रोजी सकाळी १० वाजता कार्यालयात येऊन पदभार घेतला. यानंतर गेल्या आठ दिवसांत निकाली न निघालेल्या फाइलींची तपासणी करून त्या निकाली काढल्या. त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, शिक्षकांचे पगार रखडले असल्याने सकाळी सर्व शिक्षकांच्या पगारांच्या फाइली निकाली काढल्या.
डॉ. एम.व्हि.कदम हे नाशिक विभागातील सेवाज्येष्ठ शिक्षणाधिकारी असून त्यांनी तीन जिल्ह्यात काम केले असून आता 4 था जिल्हा जळगाव आहे.तसेच ते नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात काम करणारे एकमेव अधिकारी ठरले आहेत.नाशिक नंदुरबार धुळे या 3 जिल्ह्यात काम केले आहे व आपल्या चोख कामामुळे लोकप्रिय अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती आहे
नंदुरबार जिल्हय़ात कोरोना काळात त्यांनी प्रशंसनीय काम केल्याने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते राजभवनात 8 नोव्हेंबर 2021 रोजी सत्कार करण्यात आला होता त्यांचा विरोधात कोणत्याही तक्रारी नसल्याने शिक्षक आमदार यांचे दरबारात देखील अभिनंदन चा ठराव करून सत्कार करण्यात आला होता.
डॉ.एम.व्हि.कदम यांनी कार्यभार सांभाळल्याने शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags:
शैक्षणिक