नवापूर महिला मंडळातर्फे वैद्यकीय शिबीर संपन्न....

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     तालुका महिला मंडळ नवापूर द्वारा मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन 
नवापूर महिला मंडळाच्या सभागृहात नवापूर तालुका महिला मंडळ नवापूर व मैत्रेय मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने तारीख 8 /9/ 2024 रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर तालुका महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताबेन शाह ,कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री विपिनभाई चोखावाला व श्रीमती उषाबेन जाडावाला होते. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर हर्षाली गावित, डॉक्टर डिंपल छतवाणी, श्रीमती शीतलबेन वाणी, श्री सतीशभाई शाह ,श्री जिग्नेशभाई शाह श्री धर्मेशभाई ऋषी ,डॉक्टर मेहुल परावाला श्रीमती करुणाबेन शाह आदी उपस्थित होते. नवापूर तालुका महिला मंडळ नेहमी महिलांचे आरोग्य चांगले रहावे व त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असते व विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते ,या कार्याची स्तुती कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री विपिनभाई चौखावाला यांनी केले. व पुढील कार्यवाहीच्या शुभेच्छा दिल्या. व महिला मंडळाच्या सेवा कार्याचे कौतुक केले. डॉक्टर हर्षाली गावित यांनी उपस्थित समुदायाला मेडिकल चेकअप चे महत्व सांगितले. मैत्री मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरत येथील डॉक्टर मेहुल परावाला व डॉक्टर डिंपल छतवाणी गायनॅकॉलॉजिस्ट व आईवीएफ स्पेशालिस्ट यांच्या टीम द्वारा एकूण 200 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सतीशभाई शाह, श्री राजेंद्रभाई अग्रवाल, श्री अनिल भाई शाह, श्री किशोर भाई दलाल यांनी दाता म्हणून आपले दातृत्व दिले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताबेन शाह ,उपाध्यक्ष श्रीमती काश्मीरा बेन शाह ,सहसचिव जास्मिन बेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अर्चनाबेन शाह ,श्रीमती कमलबेन पारीख, श्रीमती विनिता शाह, श्रीमती मेघा पाटील, श्रीमती शीतलबेन अग्रवाल यांनी संयोजन केले. श्रीमती श्रद्धाबेन शाह श्रीमती ममताबेन शाह ,श्रीमती बिमालाबेन अग्रवाल गीताबेन अग्रवाल श्रीमती पारुलबेन मिस्त्री ,श्रीमती रीनाबेन शाह, श्रीमती मोहिनीबेन शाह, श्रीमती तेजलबेन शाह, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मेघा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती कमलबेन परीख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती बीनिताबेन शाह यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post