नवापूरात अतिवृष्टीमुळे महामार्ग ठप्प,वाहन चालकांनी उच्छल मार्गाचा वापर

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   शहरातील रंगावली नदीला मोठा पूर आल्याने धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळी १० वाजेपासून आधी गुजरात राज्यातील पुरामुळे आणि दुपारनंतर नवापूर तालुक्यात नद्यांची पातळी वाढल्याने महामार्गावरची वाहतूक बंद झाली होती. 'रंगावली'चे पाणी शहरातील वसाहतीमध्ये शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत 'रंगावली च्या पुरपातळीत बाढ़ होत होती. अनेक वाहनचालकांनी उच्छल मार्गाचा अवलंब केला. 
 'ला निना'च्या प्रभावामुळे अस्थी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. पावसाने हा इशारा खरा ठरवत सोमवारी जिल्हयात सुरुवात झाली. वात नवापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून पाऊस सुरू होता दरम्यान, गुजरात राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळल्याने 'रंगावली सह तालुक्यातील इतर सहायक नद्यांना पूर जाला होता. सोमवारी सकाळी तालुक्यात जागोजागी पूरस्थिती निर्माण झाली होती. यात 'रंगावली'ची पाणीपातळी वाढून नवापूर शहरातून होणारी राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. दरम्यान, तत्पूर्वी सकाळी गुजरात राज्यातील व्यारा शहरालगतच्या बायपास रोडवर दोन किलोमीटरपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली होती. परिणामी महाराष्ट्र हद्दीत विसरवाडी ते वेट बेडकी चेकपोस्ट आणि पुढे गुजरात राज्यातील विविध भागांत महामार्गावर वाहने थांबली होती. दुपारी काही वेळ वाहतूक सुरळीत सुरू झाल्यानंतर नवापुरात रंगावली नदीला पूर आल्याने ही वाहतूक पुन्हा बंद झाली. रात्री
     नवापूर शहरातील रंगावली नदीला पूर आल्यानंतर पुलावरची वाहतूक बंद झाली होती. यामुळे नदीपावालगत आणि परिसरात अशी स्थिती होती. पुराचे पाणी पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करताना दिसून आले.
उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरले नसल्याने वाहतूक बंद होती.रंगावली पुलावरून वाहतूक बंद झाल्याने अनेकांनी गुजरातमधून नवापुरात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला. यात शहरातील स्वस्तिक मिलजवळील कॉजवे पुलावरून पाणी वाहत असतानाही काहींनी बाहन दामटण्याचा प्रयत्न केला, परंतु, योग्य अंदाज आल्यानंतर त्यांनी वाहने मागे घेतली.
    रंगावली पुलावर वाहतुकीस बंदी असतानाही टेम्पोचालकाने वाहन दामटले होते. है वाहन पुलावरच्या गाळात फसल्याने जेसीबीच्या सहाव्याने बाजूला करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी याठिकाणी भेट दिली 

Post a Comment

Previous Post Next Post