येथे दिनांक 06 सप्टेंबर, 2024 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत दी एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर यांनी 14 व 19 वर्षा आतील मुली यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला व 17 वर्षा आतील मुली यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन श्रीमती. प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर जि.नंदुरबार येथे दिनांक 05 व 06 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नवापूर एज्युकेशन सोसायटीचे हेमंतभाई शाह व उद्घाटक कल्पेशभाई शाह व क्रीडा स्पर्धेतील सहभागी शाळेचे क्रीडा शिक्षक व संघ व्यवस्थापक उपस्थित होते. हेमंतभाई शाह यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील क्रीडेचे महत्व व टेबल टेनिस खेळ या विषयावर मार्गदर्शन केले व त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेला सुरुवात केली.
दी एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयाने या स्पर्धेमध्ये 14,17 व 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली या संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत अल्पकालवाधीत सराव करून खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी करत स्पर्धेमध्ये 14 व 17 वर्षे मुली यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला व 19 वर्षे मुली यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व सहभागी खेळाडूंनी स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.श्रीकांत पाटील सर्व श्री.निलेश गावंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.विपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष श्री.शिरीषभाई शाह, कार्याध्यक्षा श्रीमती.शितलबेन वाणी, कोषाध्यक्ष श्री.सतीशभाई शाह, सचिव श्री.राजेंद्रभाई अग्रवाल, सहसचिव श्री.शोएबभाई मांदा, मुख्याध्यापक श्री.संजयकुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.कमलबेन परिख तसेच सर्व व्यवस्थापन मंडळातील सदस्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Tags:
शैक्षणिक