सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांचे नवापूर तालुकास्तरीय क्रिकेट (सिझन बॉल) स्पर्धेत यश संपादन.

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    एज्युकेशन सोसायटी संचलित
दी एन.डी अँड एम.वाय सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय यांचे नवापूर तालुकास्तरीय क्रिकेट (सिझन बॉल) स्पर्धेत यश संपादन केले.
   दिनांक 21 सप्टेंबर, 2024 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, नंदुरबार व नवापूर तालुका संयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवापूर तालुकास्तरीय क्रिकेट (सिझन बॉल) स्पर्धेत दी एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय यांनी यश संपादन केले.. नवापूर तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेज, नवापूर येथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. सदर स्पर्धा 14, 17 व 19 वर्ष मुले व मुली या वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत 19 वर्षा आतील मुली यांचा अंतिम सामना श्रीमती. प्र.अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर विरुद्ध दि एन.डी अँड एम.वाय सार्वजनिक हायस्कूल, नवापूर यांच्यात खेळविण्यात आला. श्रीमती. प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सदर संघाने 08 षटकात 04 बाद 57 धावा बनविल्या. त्यास प्रतिउत्तर म्हणून  दि एन.डी अँड एम.वाय सार्वजनिक हायस्कूल संघाने 5.3 षटकात 05 बाद 58 धावा बनवून विजय संपादित केला. सर्वच खेळाडूंनी अतिशय छान खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली. त्यानंतर 19 वर्षा आतील मुले संघास प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नसल्याने विजयी घोषित करण्यात आले. या दोन्ही संघांची निवड शहादा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. या दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक श्री.श्रीकांत पाटील सर व श्री.निलेश गावंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले होते..      contact -9403125928
 विजयी संघांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.बिपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष श्री.शिरीषभाई शाह, कार्याध्यक्षा श्रीमती.शितलबेन वाणी, कोषाध्यक्ष श्री.सतीशभाई शाह, सचिव श्री.राजेंद्रभाई अग्रवाल, सहसचिव श्री.शोएबभाई मांदा, मुख्याध्यापक श्री.संजयकुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.कमलबेन परिख तसेच सर्व व्यवस्थापन मंडळातील सदस्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post