श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर चा नवापुर तालुका स्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत सुयश

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     येथे क्रीडा व युवक सेवा संचालनयालय पुणे महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर तालुकास्तरीय शालेय सीजन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात श्रीमती सार्वजनिक मराठी हायस्कूलच्या 14 वर्ष आतील मुले/मुली आणि 17 वर्ष आतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजय संपादन करत जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. या सर्व विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री नरेश जयस्वाल व अविनाश पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले.
   सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री विपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक,उप-मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post