नंदूरबार(सत्यप्रकाश न्युज):-
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शनिमांडळ गाव शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर मधुन काही अज्ञात चोरटयांनी कॉपर केबल चोरुन नेले बाबत रहिवासी खंडू बना पाटील यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 268/2024 भा.न्या.सं.चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, सदरची चोरी ही नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील चाकळे गावातील इसम नामे किशोर मालचे याने त्याचे साथीदारांसह मिळून केली असुन तो सध्या नंदुरबार शहरातील जिजामाता कॉलेज परिसरात फिरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने शहरातील जिजामाता कॉलेज परिसरात जावून खात्री केली असता, बातमीप्रमाणे इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव किशोर सुपडू मालचे, रा. चाकळे ता.जि. नंदुरबार असे सांगितले, सदर इसमास वरील दाखल गुन्हयाबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला म्हणुन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरची चोरी त्याचा साथीदार गणेश शत्रू सोनवणे, दिलीप प्रताप सोनवणे, सतिश संतोष मोरे, शाम नाना मालचे, राम नाना मालचे, रमा सुपडू 7) विनोद सुपड़, देवा (पूर्ण नाव माहित नाही), सर्व राहणार चाकळे ता.जि. नंदुरबार यांचे मदतीने केली असलेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यास गुन्हयातील चोरी गेलेल्या मालाबाबत विचारता सदरचा चोरी केलेला मुद्देमाल हा नंदुरबार शहरातील जम-जम हॉस्पीटलचे मागे राहणा-या शाकीर युसूफ काकर, या भंगार व्यापा-यास विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भंगार व्यापा-याचा शोध घेतला असता तो मिळून, आल्याने त्यास नमुद गुन्हयातील मुद्देमालाबाबत विचारता त्याने सदरचा माल हा सुमित नरेंद्र जैन, रा. शिवाजी रोड, नंदुरबार यास विक्री केले असल्याचे सांगितले. त्यानुसार लागलीच स्थानिक गुन्हे पथकाने सुमित जैन यास देखील ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा मुद्देमाल हा त्याचे पातोंडा शिवारातील गैस गोडावूनचे पाठीमागील बाजुस ठेवले असल्याचे सांगितले, सदर ठिकाणाहून एकुण 1 लक्ष 57 हजार 850 रुपये किमतीची सुझलोन टॉवरमध्ये वापरण्यात येणारी कॉपर केबल मुद्देमाल मिळून आला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोउपनि मुकेश पवार, पोह राकेश मोरे, रमेश साळुंखे, पोना/मोहन ढमढेरे, पोकों/विजय ढीवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांनी केली आहे.
Tags:
गुन्हे/अपराध