नाशिक ग्रामीण मध्ये शिवसेनेच्या उपनेत्या तथा उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्या प्रमूख मार्ग दर्शनाखाली व त्यांच्या हस्ते काल म न से च्या असंख्य महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश केला. चांदवड येथील समर्थ लॉन्स मंगल कार्यालय येथे काल महिला आघाडीच्या वतीने आयोजित एका समारंभात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदवड तालुका अध्यक्ष सौ भाग्यश्री केदारे यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह या महिलांचे पक्षप्रवेश करण्यात आले. नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख भारतीताई जाधव यांच्या शिफारशीनुसार व त्यांच्या प्रयत्नांनी, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.जयंत दिंडे साहेब, शिवसेना, उपनेते मा.अद्वय आबा हिरे व जिल्हाप्रमुख मा नितीन दादा आहेर यांच्या मार्गदर्शना नुसार सदरचा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक ग्रामीण मतदारसंघातील विविध गावातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून , विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदर महिलांचा पक्षप्रवेश हा पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असल्याचे मत यावेळी शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला दिंडोरी लोकसभा संपर्क संघटक शीला ताई सोनवणे तसेच महिला आघाडी जिल्हा संघटिका भारतीताई जाधव यांच्यासह दिंडोरी चांदवड व नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Tags:
राजकीय