सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे बॉस डे कार्यक्रम उत्साहात साजरा

नवापूर : सत्यप्रकाश न्युज 
      दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी  सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे बॉस डे  उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले शुभेच्छा कार्ड नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विपिनभाई चोखावाला यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य श्री परागभाई ठक्कर, शाळेचे प्राचार्य श्री संजय कुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख, पर्यवेक्षक श्री फारुख पटेल, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री संजय कुमार जाधव होते व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सदस्य श्री परागभाई ठक्कर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती कामिनी बेरी यांनी  केली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने  करण्यात आली. कार्यक्रमाच्या  सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ व विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले शुभेच्छा कार्ड  देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर संतोषी राज पुरोहित या विद्यार्थिनीने सचिन बंसल या यशस्वी उद्योजकाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पुढे भूमिका दर्जी हिने फाल्गुनी नायक, प्राची शर्मा हिने कुमार बिर्ला,  निहारिका अग्रवाल या विद्यार्थिनीने कल्पना सरोज, तन्वी खैरकर या  विद्यार्थिनीने उद्योगपती स्वर्गवासी  रतन टाटा या उद्योजकाविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वर्गवासी श्री रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित एक व्हिडिओ दाखवण्यात आला.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य  श्री संजय कुमार जाधव  यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात वेळेचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा योग्य वापर केला पाहिजे असे त्यांनी  सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिया मुलतानी  यांनी   व आभार प्रदर्शन रोहन शिंदे यांनी केले.  शाळेचे प्राचार्य श्री संजय कुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Post a Comment

Previous Post Next Post