विधानसभा निवडणुकीत महिलांना शहरा किंवा गावालगतच्या जवळच्या केंद्रावर नियुक्ती द्यावी आ.डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी

मुंबई सत्यप्रकाश न्युज 
    लोकसभा निवडणुकीच्या  वेळेला  मतदान केंद्रावर अपुऱ्या सुविधा असल्याने शिक्षक शिक्षकेतर चे खूप हाल झाले होते ,याचे गांभीर्य लक्षात घेऊन  कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी  मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांना  पत्र लिहून, महिलांना शहरा किंवा गावालगतच्या जवळच्या केंद्रावर नियुक्ती द्यावी, साहित्य पोहोचवण्यासाठी उशीर होत असल्याने दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी, पिण्याचे शुद्ध पाणी, जेवण, झोपण्यासाठी लागणारे साहित्य  उपलब्ध करून द्यावे, व अन्य बाबींसाठी निवेदन  सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली*

Post a Comment

Previous Post Next Post